'या' बॉलिवूड अभिनेत्रीला पाहताच प्रेमात पडला होता ड्वेन जॉनसन, सगळ्यांसमोर दिली होती कबुली !

By ऑनलाइन लोकमत | Published: May 2, 2024 09:02 AM2024-05-02T09:02:09+5:302024-05-02T09:06:46+5:30

'द रॉक' अर्थात ड्वेन जॉनसन हॉलिवूडचा एक प्रसिद्ध अभिनेता आहे. ड्वेनचा जगभरात बराच मोठा चाहता वर्ग आहे. त्यानं आता ...

Dwayne Johnson fell in love with 'this' Bollywood actress, he confessed in front of everyone! | 'या' बॉलिवूड अभिनेत्रीला पाहताच प्रेमात पडला होता ड्वेन जॉनसन, सगळ्यांसमोर दिली होती कबुली !

'या' बॉलिवूड अभिनेत्रीला पाहताच प्रेमात पडला होता ड्वेन जॉनसन, सगळ्यांसमोर दिली होती कबुली !

'द रॉक' अर्थात ड्वेन जॉनसन हॉलिवूडचा एक प्रसिद्ध अभिनेता आहे. ड्वेनचा जगभरात बराच मोठा चाहता वर्ग आहे. त्यानं आता पर्यंत अनेक सुपरहिट चित्रपट दिले आहेत.  हॉलिवूडमध्ये येण्यआधी ड्वेन WWE चा एक आघाडीचा रेसलर होता. त्यानं अनेक स्पर्धा जिंकल्या आहेत. त्यामुळे त्याला 'द रॉक' या नावाने ओळखलं जातं. आज तो आपला 51 वा वाढदिवस साजरा करत आहे. तुम्हाला माहितेय का एका बॉलिवूड अभिनेत्रीला पाहताच तो तिच्या प्रेमात पडला होता.

ड्वेन जॉनसनने बॉलिवूड अभिनेत्रींसोबतही काम केलं आहे. या यादीत प्रियांका चोप्राच्या नावाचा समावेश होतो. ड्वेन जॉन्सनने 2016-2017 मध्ये पहिल्यांदा देसी गर्ल प्रियांका चोप्रासोबत'बेवॉच'मध्ये काम केलं होतं. प्रियांकाचा हा चित्रपट तिच्या चाहत्यांना खूप आवडला होता.

2017 मध्ये, ड्वेनने एका मुलाखतीत कबूल केले होते की, तिला पाहताच तो प्रियांका चोप्राच्या प्रेमात पडला होता. सध्या प्रियांका आणि ड्वेन जॉनसन दोघांमध्ये खूप चांगली मैत्री आहे. ड्वेन जॉनसन म्हणाला होता, "मला तिच्यावर प्रेम आहे, ती अमेरिकेत आली आणि माझ्या एजन्सीसोबत करार केला. मी फक्त तिच्या प्रेमात पडलो नाही तर बेवॉचमध्ये ती एक अप्रतिम खलनायक असेल असं मला वाटलं होतं'.

रॉकने त्याच्या आतापर्यंतच्या करिअरमध्ये उत्कृष्ट चित्रपटांमध्ये काम केले आहे, ज्यामध्ये 'फास्ट अँड फ्युरियस', 'रेड नोटिस', 'ब्लॅक ॲडम', 'जर्नी 2' सारख्या अनेक उत्कृष्ट चित्रपटांचा समावेश आहे. ड्वेन जॉनसनच्या वैयक्तिक आयुष्याबद्दल बोलायचं झालं तर त्यानं दोन लग्न केली असून तीन मुलींचा तो पिता आहे. आपल्या मुलींसोबतचे गोड व्हिडीओ तो सोशल मीडियावर शेअर करत असतो.  

ड्वेन जॉनसन हा कोटी रुपयांच्या संपत्तीचा मालक आहे. त्याच्या अलीशान लाइफस्टाइलबद्दल बोलायचं तर त्याला महागड्या गाड्यांची वेड आहे. त्याच्याकडे बऱ्याच महागड्या कारचं कलेक्शन आहे. ज्यात लॅम्बोर्गिनी, फेरारी अशा गाड्यांचा समावेश आहे. ड्वेन अनेक अलिशान घरांचा मालक आहे. ड्वेन जॉनसनकडे फक्त महागड्या कार आणि अलिशान-महागडी घरच नाही तर एक खासगी विमान सुद्धा आहे. ज्यातून त्याच्या कुटुंबासोबत प्रवास करतो.

Web Title: Dwayne Johnson fell in love with 'this' Bollywood actress, he confessed in front of everyone!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.