व्हिडिओ करताना ही मॉडेल घालायला विसरली ब्रा, सोशल मीडियावर झाली ट्रोल

By ऑनलाइन लोकमत | Published: April 17, 2020 07:09 PM2020-04-17T19:09:18+5:302020-04-17T19:10:48+5:30

व्हिडिओत तिने ब्रा न घातल्याने या मॉडेलला चांगलेच ट्रोल करण्यात आले होते. पण तिने ट्रोलर्सना सडेतोड उत्तर दिले आहे.

Called Immoral for Going Braless, Chef Padma Lakshmi Wears Two in Cooking Tutorial PSC | व्हिडिओ करताना ही मॉडेल घालायला विसरली ब्रा, सोशल मीडियावर झाली ट्रोल

व्हिडिओ करताना ही मॉडेल घालायला विसरली ब्रा, सोशल मीडियावर झाली ट्रोल

googlenewsNext
ठळक मुद्देहा व्हिडिओ पाहिल्यानंतर तू ब्रा घालायला विसरलीस का असा प्रश्न तिला नेटिझन्सने विचारला होता. तिच्या या व्हिडिओला प्रचंड ट्रोल करण्यात आले होते.

जगभरात सध्या कोरोना व्हायरसने थैमान घातले असताना भारतातही या व्हायरसचा विळखा घट्ट होत आहे. दिवसागणिक भारतात कोरोना संक्रमित रुग्णांमध्ये मोठ्या प्रमाणात वाढ होत आहे. देशात सुरुवातीला २१ दिवसांचा लॉकडाऊन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी जाहीर केला होता. आता तो वाढवून ३ मे पर्यंत करण्यात आला आहे. या दरम्यान सिनेमांचे शूटिंग आणि प्रमोशनही थांबवण्यात आले आहेत. एवढेच नव्हे तर भारतातील अनेक राज्यात मॉल्स, थिएटर बंद करण्यात आले आहेत. सध्या सेलिब्रेटी आपापल्या घरात असून सोशल मीडियाद्वारे आपल्या चाहत्यांशी संपर्क साधत आहेत.

प्रसिद्ध शेफ, अभिनेत्री, होस्ट पद्म लक्ष्मी सोशल मीडियाद्वारे लोकांना विविध पदार्थ बनवायला शिकवत आहे. ती सध्या नवनवीन व्हिडिओ सोशल मीडियावर अपलोड करत आहे. पण एका व्हिडिओमुळे तिला काही दिवसांपूर्वी सोशल मीडियावर ट्रोल करण्यात आले होते. तिने काही दिवसांपूर्वी एक पदार्थ शिकवतानाचा व्हिडिओ सोशल मीडियावर पोस्ट केला होता. पण हा व्हिडिओ पाहिल्यानंतर तू ब्रा घालायला विसरलीस का असा प्रश्न तिला नेटिझन्सने विचारला होता. तिच्या या व्हिडिओला प्रचंड ट्रोल करण्यात आले होते. 

पण आता पद्म लक्ष्मीने आणखी एक व्हिडिओ सोशल मीडियावर पोस्ट केला आहे. तिने या व्हिडिओसोबत तिला ट्रोल करणाऱ्या लोकांना सडेतोड उत्तर दिले आहे. तिने लिहिले आहे की, माझ्या व्हिडिओवर काही लोकांनी कमेंट केले होते की, माझ्या किचनमध्ये मी ब्रा न घालणे हे चुकीचे आहे. त्यामुळे ही गोष्ट ज्यांनी गेल्यावेळी नोटिस केली होती, त्यांनी पाहा की, मी आज एक नव्हे दोन ब्रा घातल्या आहेत. पण लोकांना मी एक सांगू इच्छिते की, स्त्रिच्या शरीरावर अशाप्रकारे कमेंट्स करणे खूपच चुकीचे आहे. 

पद्मलक्ष्मी ही प्रसिद्ध मॉडेल असून ती टॉप शेफ या कार्यक्रमाची गेल्या अनेक वर्षांपासून होस्ट आणि जज आहे. या कार्यक्रमाचा सध्या १७ वा सिझन सुरू आहे. तसेच ती एक प्रसिद्ध लेखिका असून ती मुळची चेन्नई मधील आहे. पण ती लहानाची मोठी न्यूयॉर्क आणि लॉस एंजिलिसमध्ये झाली आहे. 

Web Title: Called Immoral for Going Braless, Chef Padma Lakshmi Wears Two in Cooking Tutorial PSC

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.