एक्स बॉयफ्रेंडच्या रोमान्समुळे बेला हदीद झाली त्रस्त
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 20, 2017 22:09 IST2017-01-20T16:39:07+5:302017-01-20T22:09:07+5:30
मॉडल बेला हदीद सध्या खूपच दु:खी असल्याचे दिसत आहे. कारण तिला अजूनही एक्स बॉयफ्रेंडच्या आठवणी सतावत आहेत. सध्या तिचा ...

एक्स बॉयफ्रेंडच्या रोमान्समुळे बेला हदीद झाली त्रस्त
म डल बेला हदीद सध्या खूपच दु:खी असल्याचे दिसत आहे. कारण तिला अजूनही एक्स बॉयफ्रेंडच्या आठवणी सतावत आहेत. सध्या तिचा एक्स बॉयफ्रेंड दुसºया एका सेलेब्सला डेट करीत असून, त्या दोघांच्या रोमान्सच्या बातम्यांनी ती त्रस्त झाली आहे. त्यामुळे आता तिने जुन्या आठवणींना विसरून नवे आयुष्य जगण्याचा निर्धार केला आहे.
![]()
बेला हदीद आणि तिचा एक्स बॉयफ्रेंड द वीकेंड
बेला हदीद हिचा एक्स बॉयफ्रेंड गायक द वीकेंड हा सध्या गायिका सेलेना गोमेज हिला डेट करीत आहे. दोघांची प्रेम कहाणी अशी काही बहरली आहे की, दर दिवसाला त्यांच्या रोमान्सच्या बातम्या माध्यमांमध्ये रंगविल्या जात आहेत. याचा त्रास बेला हदीदला होत असल्याने ती बॉयफ्रेंडला विसरण्यासाठी नाना तºहेचे प्रयत्न करीत आहे.
ई-आॅनलाइन या वेबसाइटने दिलेल्या माहितीनुसार बेला हदीद तिचा एक्स बॉयफ्रेंड द वीकेंड याला अजूनही विसरू शकली नाही. दोघांमध्ये आजही चांगले संबंध असून, ते मित्रत्वाच्या नात्यात आहेत; मात्र द वीकेंड सेलेना गोमेज हिला डेट करीत असल्याने, बेला दुखावली आहे. त्यातच चहुबाजूने दोघांच्या रोमान्सचे गॉसिफ तिच्या कानावर पडत असल्याने तिला असह्य होत आहे.
![bella hadid unhappy x boyfriend the weeknd and selena gomez]()
द वीकेंड आणि सेलेना गोमेज
सूत्रांनुसार, बेला हदीद हिला अजूनही द वीकेंडसोबतचे तिचे प्रेमसंबंध बहरण्याची अपेक्षा आहे. ती त्याच्यासोबत पुन्हा प्रेमसंबंध प्रस्थापित करण्यासाठी संधीच्या शोधात आहे; मात्र सेलेना गोमेजच्या प्रेमात तो पूर्णपणे बुडाल्याने त्याला परत मिळवण्याची तिची अपेक्षा धुसर होताना दिसत आहे. गेल्या आठवड्यातच सॅँटा मेनिका येथील एका इटालियन रेस्तरांमध्ये द वीकेंड आणि सेलेना गोमेज एकमेकांना किस करताना बघावयास मिळाले होते. जेव्हा ही बाब बेला हदीदला समजली तेव्हा तिने लगेचच गोमेजला इन्स्टाग्रामवर अनफॉलो केले.
तसेच आता ती सर्व आठवणी विसरून आयुष्य जगू इच्छित आहे. त्यासाठी ती मानसिक परिपक्व होण्याचा प्रयत्न करीत आहे.