अरविंद केजरीवाल सरकारने जेम्स बॉण्ड पियर्स ब्रॉसननला बजावली नोटीस!

By ऑनलाइन लोकमत | Published: February 18, 2018 11:04 AM2018-02-18T11:04:48+5:302018-02-18T16:55:37+5:30

मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांच्या दिल्ली सरकारने हॉलिवूड स्टार्स पियर्स ब्रॉसनन याला नोटीस बजावली आहे. तसेच त्याच्याकडून दहा दिवसांत उत्तर मागविले आहे.

Arvind Kejriwal's government has issued a notice to James Bond Pierce Brosnan! | अरविंद केजरीवाल सरकारने जेम्स बॉण्ड पियर्स ब्रॉसननला बजावली नोटीस!

अरविंद केजरीवाल सरकारने जेम्स बॉण्ड पियर्स ब्रॉसननला बजावली नोटीस!

googlenewsNext
ख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांच्या सरकारने हॉलिवूड स्टार आणि जेम्स बॉण्ड फेम पियर्स ब्रॉसनन याला त्याच्या तंबाखूच्या जाहिरातीवरून नोटीस बजावली आहे. दिल्ली सरकारच्या तंबाखू नियंत्रण सेलने ही कारवाई केली आहे. याविषयी सेलच्या एका अधिकाºयाने सांगितले की, एक भारतीय ब्रॅण्ड पान मसाला विकण्याच्या नावाने तंबाखूच्या जाहिराती करीत आहे. त्यामुळेच तंबाखू उत्पादन अधिनियमच्या कलम पाच अनन्वे ही नोटीस बजावण्यात आली आहे. पियर्स ब्रॉसनन हा सध्या पान मसाल्याच्या उत्पादनाच्या जाहिरातींमध्ये झळकत आहे. 

दरम्यान, अशाप्रकारच्या जाहिरातींमध्ये मूळ उत्पादन न दाखविता इतर पदार्थांचीच अधिक जाहिरात केली जात असल्याने, ग्राहक त्याकडे आकर्षित होण्याची शक्यता आहे. त्यामुळे जाहिरात करणाºयाने त्या पदार्थांचे नाव घेऊ नये. सेलने पियर्सकडून दहा दिवसांच्या आत उत्तर मागविले आहे. एका न्यूज पोर्टलने दिलेल्या माहितीनुसार, सेलचे प्रभारी डॉ. अरोरा यांनी सांगितले की, ‘आम्ही यापूर्वीच जेम्स बॉण्ड पियर्स ब्रॉसननला नोटीस बजावली होती. त्यावेळी त्याने जाहिरात करणार नसल्याचे म्हटले होते. मात्र आता पुन्हा एकदा तो जाहिरातीत झळकत आहे. बºयाचशा दुकानांवर त्याचे पोस्टर्स झळकत आहेत. सध्या सेलतर्फे हे पोस्टर हटविण्याचे काम सुरू आहे. 
 

डॉ. अरोरा यांनी सांगितले की, पान मसाल्यात सुपारीचा वापर केला जातो, ज्यामुळे कर्करोग होण्याची शक्यता असते. ज्या उत्पादनाची पियर्स जाहिरात करीत आहे त्याच नावाने कंपनीचे तंबाखू उत्पादनही केले जाते. दरम्यान, या अगोदर दिल्ली सरकारने बॉलिवूड स्टार अजय देवगण याला नोटीस बजावली आहे. यावेळी सरकारने हेदेखील स्पष्ट केले होते की, कोणत्याही बॉलिवूड कलाकाराने अशाप्रकारच्या उत्पादनाची जाहिरात करू नये. 

Web Title: Arvind Kejriwal's government has issued a notice to James Bond Pierce Brosnan!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.