अ‍ॅँजेलिना जोली म्हणाली, ब्रॅड पिट आणि मी अजूनही एकत्रच!

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 21, 2017 19:57 IST2017-02-21T14:27:58+5:302017-02-21T19:57:58+5:30

सर्वाधिक चर्चेत राहिलेला घटस्फोट म्हणून अभिनेत्री अ‍ॅँजेलिना जोली आणि ब्रॅड पिट या एकेकाळच्या दाम्पत्याकडे बघितले जाते. परंतु सर्वाधिक चर्चेत ...

Angelina Jolie said, Brad Pitt and I'm still together! | अ‍ॅँजेलिना जोली म्हणाली, ब्रॅड पिट आणि मी अजूनही एकत्रच!

अ‍ॅँजेलिना जोली म्हणाली, ब्रॅड पिट आणि मी अजूनही एकत्रच!

्वाधिक चर्चेत राहिलेला घटस्फोट म्हणून अभिनेत्री अ‍ॅँजेलिना जोली आणि ब्रॅड पिट या एकेकाळच्या दाम्पत्याकडे बघितले जाते. परंतु सर्वाधिक चर्चेत राहिलेला हा घटस्फोटो अ‍ॅँजेलिना आणि पिटचे मनं तोडण्यात यशस्वी झाला काय? हे सांगणे मुश्किलच म्हणावे लागेल. कारण अ‍ॅँजेलिनाने नुकतेच, ‘घटस्फोट जरी झाला असला तरी ब्रॅड पिट आणि मी एक परिवार असून, कायम राहणार आहोत’ असे म्हटले आहे. 

पीपल मॅगजीनने दिलेल्या माहितीनुसार, जोलीने पहिल्यांदाच तिच्या या बहुचर्चित घटस्फोटावर चुपी तोडली आहे. अ‍ॅँजेलिनाने कंबोडिया येथे ‘बीबीसी वर्ल्ड न्यूज’च्या यालदा हकीमला सांगितले की, मी यावर अधिक काही बोलू इच्छित नाही. केवळ एवढेच सांगू इच्छिते की, हा खूप कठीण प्रसंग आहे. अशातही आम्ही एक परिवार आहोत आणि कायम राहणार आहोत. या कठीण प्रसंगातून आम्ही लवकरच बाहेर पडणार असून, एक मजबूत परिवार म्हणून समोर येणार आहोत. अ‍ॅँजेलिना तिच्या ‘फर्स्ट डे किल्ड माय फादर’ या आगामी सिनेमाच्या प्रमोशनसाठी कंबोडिया येथे गेली होती. 



खरं तर कंबोडिया हे ठिकाण अ‍ॅँजेलिनाच्या नेहमीच जवळ राहिले आहे. कारण तिने पहिला मुलगा (मॅडोक्स १५) कंबोडियाच्या अनाथालयातून २००२ मध्ये दत्तक घेतला होता. याव्यतिरिक्त अ‍ॅँजेलिनाला सहा मुले आहेत. मुलांचे भवितव्य आणि संपूर्ण परिवाराविषयी अ‍ॅँजेलिनाने तिचे मत व्यक्त केले. ती म्हणाली की मी, माझे मुले अन् संपूर्ण परिवार सध्या एका कठीण काळाचा सामना करीत आहोत. माझे संपूर्ण लक्ष माझ्या मुलांकडे आहे. यातून बाहेर पडण्यासाठी आम्ही मार्ग शोधत आहोत. आम्ही एक परिवार असून, कायम एकजूट राहणार आहोत. मी यासर्व परिस्थितीला उबगली आहे. यातून बाहेर पडण्याचा मार्ग मी शोधत आहे. मला बळ मिळो हीच प्रार्थना मी करतेय, असेही अ‍ॅँजेलिनाने म्हटले. 

अ‍ॅँजेलिना आणि ब्रॅड पिटमध्ये निर्माण झालेल्या दुराव्यानंतर सप्टेंबर २०१६ मध्ये त्यांनी घटस्फोटासाठी अर्ज दाखल केला होता. यावेळी मुलांवरून दोघांमध्ये वादही निर्माण झाला होता. अ‍ॅँजेलिनाने तर ब्रॅडच्या सर्व आठवणी विसरण्यासाठी प्रत्येक गोष्ट (अंगावरील टॅटू) नष्ट केले होते. आता अचानक अ‍ॅँजेलिनाकडून ब्रॅड पिटच्या आठवणी ताज्या केल्या जात असल्याने हे जोडपे पुन्हा एकत्र येणार काय? असा प्रश्न आता उपस्थित केला जात आहे. 

Web Title: Angelina Jolie said, Brad Pitt and I'm still together!