टॉम क्रूझ थेट अंतराळात करणार चौथं लग्न, कोण आहे २६ वर्षांनी लहान असलेली त्याची प्रेयसी अॅना?
By ऑनलाइन लोकमत | Updated: October 3, 2025 12:43 IST2025-10-03T12:42:06+5:302025-10-03T12:43:24+5:30
टॉम क्रूझ त्याच्यापेक्षा २६ वर्ष लहान अभिनेत्रीसोबत लग्नबंधनात अडकणार आहे.

टॉम क्रूझ थेट अंतराळात करणार चौथं लग्न, कोण आहे २६ वर्षांनी लहान असलेली त्याची प्रेयसी अॅना?
Tom Cruise-Ana De Armas Wedding: टॉम क्रूझ हा हॉलिवूडमधील एक प्रसिद्ध आणि यशस्वी अभिनेता आहे. तो जगातील सर्वाधिक मानधन घेणाऱ्या सुपरस्टार्सपैकी एक म्हणून ओळखला जातो. त्याचे अॅक्शन सीनच प्रेक्षकांना शेवटपर्यंत खिळवून ठेवतात. सध्या हा हॉलिवूड सुपरस्टार वैयक्तिक आयुष्यामुळे चर्चेत आला आहे. टॉम क्रूझ हा चौथ्यांदा लग्नबंधनात अडकणार आहे. टॉम क्रूझ ज्या मुलीशी लग्न करणार आहे, ती त्याची दीर्घकाळची प्रेयसी ॲना डी आर्मास (Ana De Armas) आहे.
ॲना डी आर्मास ही लोकप्रिय अभिनेत्री आहे. तीचा जन्म ३० एप्रिल १९८८ रोजी क्यूबामध्ये झाला. अभिनयाची सुरुवात तिने क्यूबन चित्रपटसृष्टीतून केली, पण नंतर स्पेनमध्ये आणि त्यानंतर हॉलिवूडमध्ये तिने आपलं वेगळं स्थान निर्माण केलं. ॲना डी आर्मास काही काळ हॉलिवूड स्टार बेन अॅफ्लेकसोबत रिलेशनशिपमध्ये होती, ज्यामुळे ती खूप चर्चेत आली होती. पण, नंतर त्यांचं ब्रेकअप झालं. आता ॲना टॉमच्या आकंठ प्रेमात आहे.
वयात अंतर
टॉम क्रूझचं वय ६३ असून आणि अॅना डी आर्मास ३७ वर्षांची आहे. दोघांमध्ये २६ वर्षांचा फरक आहे. टॉम आणि अॅना हे दोघेही साहसप्रेमी आहेत. याच गोष्टींमुळे त्यांना एकमेकांच्या जवळ आणलं. त्यामुळे ते थेट अंतराळात लग्न करणार आहेत. टॉमला आपलं चौथे लग्न अविस्मरणीय बनवायचं आहे, यासाठी त्याने ही खास योजना आखली आहे.
तीन वेळा लग्न केले आणि तिन्ही मोडले
टॉम क्रूझच्या वैयक्तिक आयुष्याशीही अनेक रहस्ये जोडलेली आहेत. टॉमने तीन वेळा लग्न केले आणि तिन्ही वेळा त्याचे वैवाहिक आयुष्य उद्ध्वस्त झाले. सर्वप्रथम, त्याने १९८७ मध्ये मिमी रॉजर्सशी लग्न केले, जे फक्त तीन वर्ष टिकले आणि १९९० मध्ये ते वेगळे झाले. यानंतर तो त्याचवर्षी प्रेमात पडला जेव्हा तो त्याच्या पहिल्या पत्नीपासून वेगळा झाला. टॉमने १९९० मध्ये अभिनेत्री निकोल किडमनशी लग्न केले. हे नातेही फार काळ टिकले नाही आणि २००१ मध्ये दोघे वेगळे झाले. यानंतर टॉप क्रूझ जवळपास ५ वर्ष कोणालाही डेट केलं नाही आणि लग्नही केलं नाही. यानंतर २००६ मध्ये केटी होम्सने त्यांच्या आयुष्यात प्रवेश केला. केटी आणि टॉमचे हे नाते सहा वर्ष टिकले आणि दोघे २०१२ मध्ये वेगळे झाले. आता लवकर टॉम अॅना डी आर्मास सोबत नव्या आयुष्याची सुरुवात करणार आहे.