एकदा नव्हे दोनदा पसरली प्रसिद्ध अभिनेत्याच्या मृत्यूची अफवा, शेवटी सांगावं लागलं- "मी जिवंत आहे..."
By ऑनलाइन लोकमत | Updated: November 11, 2025 11:34 IST2025-11-11T11:33:50+5:302025-11-11T11:34:20+5:30
सुप्रसिद्ध अभिनेते आणि मार्शल आर्टिस्ट जॅकी चॅन यांच्या निधनाची अफवा पसरली आहे. एका पोस्टमुळे ही अफवा व्हायरल झाली आहे. फेसबुक आणि एक्सवर करण्यात आलेल्या एका पोस्टमुळे जॅकी चॅन यांच्या निधनाची खोटी बातमी वाऱ्यासारखी पसरली आहे.

एकदा नव्हे दोनदा पसरली प्रसिद्ध अभिनेत्याच्या मृत्यूची अफवा, शेवटी सांगावं लागलं- "मी जिवंत आहे..."
अनेकदा सेलिब्रिटींबाबत सोशल मीडियावर चुकीच्या पोस्ट केल्या जातात. त्या व्हायरल झाल्यामुळे लोकही त्यावर विश्वास ठेवतात. सध्या एका बॉलिवूड अभिनेत्याच्या निधनाच्या बातमीनेही सोशल मीडियावर गोंधळ उडाला आहे. सुप्रसिद्ध अभिनेते आणि मार्शल आर्टिस्ट जॅकी चॅन यांच्या निधनाची अफवा पसरली आहे. एका पोस्टमुळे ही अफवा व्हायरल झाली आहे. फेसबुक आणि एक्सवर करण्यात आलेल्या एका पोस्टमुळे जॅकी चॅन यांच्या निधनाची खोटी बातमी वाऱ्यासारखी पसरली आहे.
७१ वर्षीय जॅकी चॅन यांच्याबाबत एक पोस्ट व्हायरल होत आहे. यामध्ये असं म्हटलं आहे की "काही वर्षांपूर्वी सेटवर झालेल्या दुखापतीमुळे जॅकी चॅन यांना त्रास झाला होता. ते आजाराशी झुंज देत होते. अखेर त्यांची ही झुंज संपल्याचं कुटुंबीयांनी सांगितलं आहे". दुसऱ्या एका पोस्टमध्ये म्हटलं होतं की "गेल्या काही महिन्यांपासून त्यांच्यावर उपचार सुरू होते आणि आज त्यांचं निधन झालं". या पोस्टमुळे जॅकी चॅन यांचं निधन झाल्याची अफवा पसरली आहे. जॅकी चॅन यांच्या निधनाच्या अफेवर चाहत्यांनी नाराजी व्यक्त केली आहे.
जॅकी चॅन यांच्या निधनाची चुकीची बातमी पहिल्यांदाच आलेली नाही. याआधी २०१५ मध्येही जॅकी चॅन यांचं निधन झाल्याचं खोटं वृत्त पसरलं होतं. या अफवांना जॅकी चॅन यांनी स्वत: उत्तर दिलं होतं. "मी विमानातून उतरलो तेव्हा दोन बातम्यांमुळे मला धक्का बसला, काळजी करू नका! मी अजूनही जिवंत आहे", असं ते म्हणाले होते.
जॅकी चॅन हे सिनेविश्वातील लोकप्रिय नाव आहे. अभिनेता असण्यासोबतच ते स्टंटमॅन, दिग्दर्शक, अॅक्शन कोरिओग्राफर, निर्माता आणि गायकही आहेत. मार्शल आर्टिस्ट म्हणून ओळख असलेले जॅकी चॅन हे कराटे किड, रश हवर, ड्रंकन मास्टर, पोलीस स्टोरी या सिनेमांमुळे ओळखले जातात.