६३ व्या वर्षी लोकप्रिय अभिनेता ३७ वर्षीय अभिनेत्रीसोबत लग्न करणार; थेट अंतराळात करणार लग्न
By ऑनलाइन लोकमत | Updated: October 1, 2025 16:57 IST2025-10-01T16:50:55+5:302025-10-01T16:57:59+5:30
ही अभिनेत्री अभिनेत्यापेक्षा २६ वर्षांनी लहान आहे. हा अभिनेता चौथ्यांदा बोहल्यावर चढणार असून स्पेसमध्ये लग्न करणार असल्याने सर्वांना धक्का बसला आहे

६३ व्या वर्षी लोकप्रिय अभिनेता ३७ वर्षीय अभिनेत्रीसोबत लग्न करणार; थेट अंतराळात करणार लग्न
ऐकावं ते नवलच. एक सुप्रसिद्ध अभिनेता त्याच्यापेक्षा २६ वर्ष लहान अभिनेत्रीसोबत लग्नबंधनात अडकणार आहे. इतकंच नव्हे कोणत्याही बंदिस्त हॉलमध्ये किंवा आलिशान जागेत लग्न न करता हा अभिनेता थेट अंतराळात लग्न करण्याच्या तयारीत आहे. हा ६३ वर्षीय अभिनेता चौथ्यांदा बोहल्यावर चढणार आहे. या अभिनेत्याचं नाव आहे टॉम क्रुझ. हॉलिवूड सुपरस्टार टॉम क्रूझच्या लग्नासंबंधीच्या बातमीची आज चांगलीच चर्चा आहे. जाणून घ्या सविस्तर
थेट अंतराळात बांधणार लग्नगाठ
जगभरात लोकप्रिय असलेला हॉलिवूड सुपरस्टार टॉम क्रूझ (Tom Cruise) वयाच्या ६३ व्या वर्षी चौथ्यांदा लग्नबंधनात अडकणार असल्याची जोरदार चर्चा आहे. विशेष म्हणजे, तो त्यांच्यापेक्षा २६ वर्षांनी लहान असलेल्या अभिनेत्रीला आपली जीवनसाथी बनवणार आहेत. अभिनेत्री ॲना डी आर्मास (Ana De Armas) सोबत टॉम विवाह करणार आहे. ॲना ही ३७ वर्षांची आहे. गेल्या अनेक दिवसांपासून हे दोघे एकमेकांना डेट करत असल्याची चर्चा होती. इतकंच नव्हे, जुलैमध्ये दोघांना एकत्र फिरताना पाहून या वृत्ताला दुजोरा मिळाला होता.
Tom Cruise, 63, and Ana de Armas, 37, just made their first public appearance together. pic.twitter.com/qE7Kn4wbw0
— Oscar Race (@TheOscarRace) July 29, 2025
विशेष म्हणजे, टॉम क्रूझला हे लग्न खूप खास आणि एखाद्या चित्रपटासारखे रोमांचक करायचं आहे. 'रडार ऑनलाइन'च्या रिपोर्टनुसार, टॉम आणि ॲना या दोघांना साहसी ॲक्टिव्हिटीज खूप आवडतात. याच गोष्टींमुळे त्यांना एकमेकांच्या जवळ आणलं. त्यामुळे रिपोर्टनुसार, टॉम क्रूझला अंतराळ प्रवासाची खूप आवड असल्यामुळे, ते आपल्या लग्नासाठी 'स्पेस'मध्ये जाण्याचा विचार करत आहेत. याआधी, स्कायडायव्हिंग करताना त्यांनी हवेतच एकमेकांना प्रपोज केलं होतं. त्यामुळे सूत्रांनुसार, "ते दोघे जे काही करतील, ते सामान्य विवाहापेक्षा खूप वेगळे असेल." आता सर्वांना टॉमच्या लग्नाचाी उत्सुकता आहे.