सुपरस्टार नानी आणि श्रीनीधी शेट्टीचा 'हिट: द थर्ड केस' आता OTTवर; कुठे पाहाल?
By ऑनलाइन लोकमत | Updated: May 26, 2025 12:59 IST2025-05-26T12:55:38+5:302025-05-26T12:59:08+5:30
नानी हा साऊथमधील प्रसिद्ध अभिनेता आहे. त्याच्या चित्रपटांना प्रेक्षकांची पसंती मिळते.

सुपरस्टार नानी आणि श्रीनीधी शेट्टीचा 'हिट: द थर्ड केस' आता OTTवर; कुठे पाहाल?
सध्या दाक्षिणात्य चित्रपट बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ घालत आहेत. 'महाराजा' (Maharaja), 'पुष्पा २: द रूल' (Pushpa 2: The Rule) या साऊथ चित्रपटांना केवळ भारतामधीलच नाही तर जगभरतील प्रेक्षकांची पसंती मिळाली. या चित्रपटांनी बॉक्स ऑफिसवर कोट्यवधींची कमाई केली. आता साऊथ सुपरस्टार नानीचा (Nani) 'हिट: द थर्ड केस' हा चित्रपट चर्चेत आहे. या चित्रपटानं रिलीज होताच कोट्यवधींची कमाई केली आहे.
नानी हा साऊथमधील प्रसिद्ध अभिनेता आहे. त्याच्या चित्रपटांना प्रेक्षकांची पसंती मिळते. त्याचा 'हिट: द थर्ड केस' १ मे रोजी प्रदर्शित झाला होता. नानीसोबत या चित्रपटात केजीएफ फेम श्रीनिधी शेट्टी झळकली. नानीनं या चित्रपटात एका आयपीएस अधिकाऱ्याची भूमिका साकारली आहे. आता या चित्रपटाची ओटीटी रिलीज तारीख अधिकृतपणे जाहीर करण्यात आली आहे.
'हिट: द थर्ड केस' हा चित्रपट २९ मे रोजी ओटीटीवर प्रदर्शित होणार असल्याचं सांगण्यात आलं आहे. येत्या २९ मे रोजी नेटफ्लिक्सवर हिंदी, तेलुगू, तमिळ, कन्नड आणि मल्याळम भाषेत 'हिट: द थर्ड केस' पाहता येणार आहे. 'हिट: द थर्ड केस'च्या कलेक्शनबद्दल बोलायचे झालं तर, या चित्रपटानं जगभरात १०० कोटींपेक्षा जास्त कमाई केली आहे. आता हा चित्रपट ओटीटीवर कसा परफॉर्म करतो हे पाहणे उत्सुकतेचे ठरेल.