नायिका...पित्याची अन मुलाचीही!
By Admin | Updated: December 14, 2015 12:12 IST2015-12-14T01:24:47+5:302015-12-14T12:12:51+5:30
बॉलिवूडमध्ये नायिकांचे करिअर फार लांब नसते. नायकांसारखे वीस-वीस वर्ष अधिराज्य काही त्यांना गाजवता येत नाही. कितीही सुंदर अभिनय असला तरी वयाच्या एका टप्प्यावर त्यांना निवृत्ती घ्यावीच लागते.

नायिका...पित्याची अन मुलाचीही!
पडद्यावरच्या नात्यांचे अजब कनेक्शन
बॉलिवूडमध्ये नायिकांचे करिअर फार लांब नसते. नायकांसारखे वीस-वीस वर्ष अधिराज्य काही त्यांना गाजवता येत नाही. कितीही सुंदर अभिनय असला तरी वयाच्या एका टप्प्यावर त्यांना निवृत्ती घ्यावीच लागते. परंतु काही नायिका याला अपवाद ठरल्या आहेत. प्रेक्षकांच्या प्रेमाच्या बळावर त्यांनी लाँग इनिंग खेळली आहे. इतकी लाँग की एका दशकात त्या एका अभिनेत्याच्या नायिका झाल्या तर दुसऱ्या दशकात चक्क त्याच अभिनेत्याच्या मुलाची नायिकाही म्हणूनही प्रेक्षकांसमोर आल्यात. कुणी केला असा अनोखा विक्रम बघूयात...
विनोद खन्ना-अक्षय खन्ना
विनोद खन्ना व त्यांचा मुलगा अक्षय खन्ना यांचीही कहानी अशीच आहे. मुकुल आनंदच्या ‘खून का कर्ज’ आणि ‘इंसाफ’ या चित्रपटात विनोद खन्नाची नायिका डिंपलने फरहान अख्तरच्या निर्देशनातील पहला चित्रपट ‘दिल चाहता है’ मध्ये अक्षय खन्नाच्या प्रेयसीचे पात्र साकारले होते. विनोद खन्ना आणि अक्षय खन्ना सोबत माधुरी दीक्षितनेदेखील काम केले आहे. फिरोज खानच्या ‘दयावान’ मध्ये विनोद खन्नासोबत ती दिसली आणि ‘मोहब्बत’मध्ये ती चक्क अक्षय खन्नाची नायिका झाली.
ऋषी कपूर-राज कपूर
ऋषी कपूर आणि त्यांचे वडील राजकपूर सोबत नायिका म्हणून काम केलेल्यांमध्ये हेमा मालिनी आणि रेखा यांचे नावे घेता येतील. हेमा मालिनीचा पहिला हिंदी चित्रपट ‘सपनों का सौदागर’मध्ये राजकपूर होते, तर ‘एक चादर मैली सी’ मध्ये तिचा नायक ऋषी कपूर होता. ‘धरम-करम’ मध्ये राजकपूर सोबत काम के ल्यानंतर रेखाने ‘आजाद देश के गुलाम’ मध्ये ऋषी कपूर सोबत काम केले.
अमिताभ बच्चन-अभिषेक बच्चन
बच्चन परिवारचेही नाव या यादीत आहे. अमिताभ बच्चन आणि अभिषेक सोबत काम करणाऱ्या नायिकांमध्ये शिल्पा शेट्टी आणि रानी मुखर्जीचे नाव आहे. संजय लीला भंसाळीच्या ‘ब्लॅक’मध्ये राणी बिग बी सोबत होती तर ‘बंटी और बबली’ पासून ते ‘युवा’ पर्यंत अर्धा डझन चित्रपटात रानी जूनियर बच्चनची नायिका राहिली. शिल्पा शेट्टी ‘लाल बादशाह’ या चित्रपटात अमिताभ बच्चनची नायिका होती तर ‘फिर मिलेंगे’मध्ये ती अभिषेकसोबत सिल्वर स्क्रीनवर आली.
धर्मेंद्र - सनी देओल
अशा वडील व मुलाच्या जोडींमध्ये सर्वप्रथम पुढे नाव येते ते धर्मेंद्र आणि सनी देओलचे. ज्यांच्या सोबत चार अभिनेत्रींनी मुख्य भूमिका साकारली आहे. सनी देओल सोबत ‘बेताब’ मध्ये काम करणारी अमृता सिंह, ‘सच्चाई की ताकत’ या चित्रपटात धर्मेंद्रची जोडीदार होती. जयाप्रदाने ‘सिक्का’मध्ये धर्मेंद्रची नायिका म्हणून काम के ले, तर टी. रामारावच्या ‘मजबूर’मध्ये ती सनी देओलची नायिका झाली. श्रीदेवीने ‘नाकाबंदी’मध्ये धर्मेंद्र सोबत काम केले, तर ‘चालबाज’मध्ये ती सनीची प्रेयसी म्हणून पडद्यावर अवतरली. ही यादी डिंपल कापडियाच्या नावाशिवाय पूर्ण होऊ शकत नाही. सनीची सर्वात आवडती डिंपल जेपी दत्ताच्या ‘बंटवारा’मध्ये धर्मेंद्र सोबत, तर ‘अर्जुन’ आणि ‘गुनाह’ बरोबरच बऱ्याच चित्रपटात सनी देओल सोबत रूपेरी पडद्यावर आली.