पूजानं उलगडलं तिचं पहिलं प्रेम

By Admin | Updated: November 2, 2015 01:20 IST2015-11-02T01:20:35+5:302015-11-02T01:20:35+5:30

क्षणभर विश्रांती, पोश्टर बॉईज, नीळकंठ मास्तर या चित्रपटांतून एक वेगळा चेहरा मराठी चित्रपटसृष्टीला मिळाला, तिचे नाव पूजा सावंत. या चित्रपटांनंतर अनेक तरुण तिच्या प्रेमात पडले.

Her first love was revealed by Pujya | पूजानं उलगडलं तिचं पहिलं प्रेम

पूजानं उलगडलं तिचं पहिलं प्रेम

क्षणभर विश्रांती, पोश्टर बॉईज, नीळकंठ मास्तर या चित्रपटांतून एक वेगळा चेहरा मराठी चित्रपटसृष्टीला मिळाला, तिचे नाव पूजा सावंत. या चित्रपटांनंतर अनेक तरुण तिच्या प्रेमात पडले. पण ऐका रे... तिने तिच्या पहिल्या प्रेमाचं नाव जाहीर केलं आहे. पूजाला तिचं पहिलं प्रेम शाळेत असतानाच झालं आणि तिनं त्याला ‘कहो ना प्यार है’ असं सांगून टाकलं... तिच्या स्वप्नात... थोडीशी आयडिया आली असेल ना आता तुम्हाला. पूजा दुसऱ्या कोणाच्या नाही, तर पहिल्यांदा आपला ‘डुग्गू’ म्हणजेच बॉलिवूड अभिनेता हृतिक रोशनच्या प्रेमात पडली आणि आपला भावी लाइफ पार्टनर असाच असावा, हा तिनं निश्चय केला. त्यामुळे आता डुग्गू उर्फ हृतिक रोशन तर नाही, पण त्याच्यासारखाच चिकना, हॅण्डसम, डॅशिंग, जोडीदार तिला लवकरच मिळू दे, अशी प्रार्थना करू.

Web Title: Her first love was revealed by Pujya

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.