भारतराव अन् बज्यासोबत येतोय हेमंत ढोमे

By Admin | Updated: May 1, 2016 02:08 IST2016-05-01T02:08:53+5:302016-05-01T02:08:53+5:30

हेमंत येतोय भारतराव अन् बज्यासोबत लवकरच. पोश्टर गर्ल आठवतोय का तुम्हाला? त्यामध्ये भारतराव झेंडेची भूमिका साकारणारा आपला रांगडा अभिनेता जितेंद्र जोशी सगळ्यांच्याच

Hemant Dhoome is coming along with Bharatav and Bajrang | भारतराव अन् बज्यासोबत येतोय हेमंत ढोमे

भारतराव अन् बज्यासोबत येतोय हेमंत ढोमे

हेमंत येतोय भारतराव अन् बज्यासोबत लवकरच. पोश्टर गर्ल आठवतोय का तुम्हाला? त्यामध्ये भारतराव झेंडेची भूमिका साकारणारा आपला रांगडा अभिनेता जितेंद्र जोशी सगळ्यांच्याच लक्षात राहिला होता, तर बजरंगची भूमिका करणारा लाजराबुजरा बज्या म्हणजेच आपला चॉकलेट बॉय अनिकेत विश्वासराव याला तरी कसं काय विसरणार, तर आता हा भारतराव, बज्या अन् सगळ्यांचा लाडका हेमंत ढोमे हे त्रिकूट पुन्हा एकदा आपल्याला मोठ्या पडद्यावर पाहायला मिळणार आहे. असे आम्ही नाही तर खुद्द हेमंत ढोमे सांगत आहे. हेमंतने नुकतेच सोशल साइटवरून म्हटले आहे की, कमिंग टुगेदर वेरी सुन विथ माय भारतराव अ‍ॅण्ड बजरंग. आता या तिघांची जोडी एकत्र आल्यावर किती धम्माल करतेय ते पाहणे त्यांच्या चाहत्यांसाठी नक्कीच औत्सुक्याचे ठरणार आहे. पोश्टर गर्लमध्ये या तिघांचे ट्युनिंग तर चांगलेच जमून आले होते. हेमंतला त्याच्या या नव्या चित्रपटाविषयी विचारले असता त्याने ‘सीएनएक्स’ला सांगितले,

आम्ही तिघे लवकरच एका चित्रपटात
एकत्र येत आहोत. परंतु, त्या चित्रपटाचे नाव काय असेल, कथानक काय असेल, याविषयी आम्ही आताच काही सांगू शकत नाही. हेमंतने जरी चित्रपटाचे नाव गुलदस्त्यात ठेवले असले, तरी आपल्यासमोर येत्या काही दिवसांतच या चित्रपटाचे काही पैलू उलगडतील हे मात्र नक्की.

Web Title: Hemant Dhoome is coming along with Bharatav and Bajrang

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.