"अगदी धरमजींवर गेला आहे...", हेमा मालिनींनी सनी देओलबद्दल म्हटलं होतं असं काही...
By ऑनलाइन लोकमत | Updated: November 28, 2025 11:48 IST2025-11-28T11:48:23+5:302025-11-28T11:48:55+5:30
Hema Malini : अभिनेत्री हेमा मालिनी यांचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर खूप पाहिला जात आहे. या व्हिडीओमध्ये त्या धर्मेंद्र आणि सनी-बॉबी देओल यांच्यासोबतच्या त्यांच्या नात्याबद्दल बोलत आहेत.

"अगदी धरमजींवर गेला आहे...", हेमा मालिनींनी सनी देओलबद्दल म्हटलं होतं असं काही...
ज्येष्ठ अभिनेते धर्मेंद्र यांच्या निधनामुळे देओल कुटुंबाला खूप मोठा धक्का बसला आहे. त्यांच्या निधनामुळे इंडस्ट्रीवर शोककळा पसरली आहे. या सगळ्यादरम्यान बॉलिवूड अभिनेत्री हेमा मालिनी यांची एक जुनी मुलाखत सोशल मीडियावर प्रेक्षकांमध्ये खूप व्हायरल होत आहे. या मुलाखतीत हेमा मालिनी धर्मेंद्र यांच्यासोबतचा त्यांचा विवाह आणि धर्मेंद्र यांची पहिली पत्नी प्रकाश कौर तसेच त्यांचे दोन मुलगे सनी आणि बॉबी देओल यांच्यासोबतच्या त्यांच्या नात्याबद्दल बोलत आहेत.
सोशल मीडियावर व्हायरल होत असलेला हा व्हिडीओ अभिनेत्री सिमी गरेवाल यांच्या 'रेंडेजवस विथ सिमी गरेवाल' या शोच्या एका भागातील आहे. या भागात हेमा मालिनी यांच्यासोबत त्यांच्या दोन्ही मुली ईशा आणि अहाना यांनीही सहभाग घेतला होता. या संभाषणात हेमा मालिनी अनेक खुलासे करतात. पण सर्वात महत्त्वाचा आणि मनोरंजक भाग तेव्हा येतो, जेव्हा त्या त्यांचा सावत्र मुलगा सनी देओलचा स्वभाव कोणावर गेला आहे, याबद्दल खुलासा करतात.
सनी-बॉबी आणि ईशा-अहाना यांचं नातं कसं आहे?
मुलाखतीत सिमी गरेवाल ईशा आणि अहाना यांना अनेक प्रश्न विचारतात. दोघीही तितक्याच स्पष्टपणे सिमीच्या प्रश्नांची उत्तरे देताना दिसतात. शेवटी, सिमी यांनी ईशाला विचारलं की त्यांचे भाऊ सनी आणि बॉबी देओल यांच्यासोबतचे बॉन्डिंग कसे आहे. यावर ईशा म्हणाली, ''आम्ही दोघांच्याही जवळ आहोत, पण आम्ही सनी भाईंना जास्त भेटतो, कारण जेव्हाही आम्ही परदेशात जातो, विशेषतः लंडनमध्ये तेव्हा त्यांची अधिक भेट होते. आम्ही तिथे त्यांच्यासोबत बराच वेळ घालवतो. बॉबी भाई कधीकधी येतात, पण आमचा जास्त वेळ सनी भाईंसोबतच जातो.''
हेमा मालिनी यांनी सनीबद्दल म्हणाल्या...
हेमा मालिनी सनी देओल यांची स्तुती करताना म्हणाल्या की, सनी अगदी धरमजींवर गेला आहे. त्याचे वागणे, बोलण्याची पद्धत या सगळ्यात धरमजींची झलक दिसते. तो खूप चांगला माणूस आहे. बॉबीबद्दल बोलायचं तर, तो मस्त-मौला आहे, कारण तो लहान आहे, त्यामुळे त्याचा स्वभावही थोडा वेगळा आहे.
१९७९ साली धर्मेंद्र आणि हेमा मालिनी यांनी केलं होतं लग्न
धर्मेंद्र यांचं आधीच लग्न झालेले होते आणि ते चार मुलांचे वडील होते. यानंतरही ते हेमा मालिनींच्या प्रेमात पडले. धर्मेंद्र विवाहित असूनही हेमा यांना कोणतीही अडचण नव्हती. धर्मेंद्र-हेमा मालिनी यांचं लग्न १९७९ मध्ये झाले होते. लग्नानंतर या जोडप्याला ईशा आणि अहाना या दोन मुली झाल्या.