‘हेट स्टोरी ३’ला मिळाले मोठे यश

By Admin | Updated: December 8, 2015 01:05 IST2015-12-08T01:05:13+5:302015-12-08T01:05:13+5:30

सेक्सच्या भरपूर मालमसाल्याने तयार केलेल्या ‘हेट स्टोरी ३’वर कथेवरून चित्रपटावर टीका होत असली तरी हॉट फार्म्युल्याने सामान्य प्रेक्षकांना खूश केले आहे.

Hate Story 3 gets big success | ‘हेट स्टोरी ३’ला मिळाले मोठे यश

‘हेट स्टोरी ३’ला मिळाले मोठे यश

सेक्सच्या भरपूर मालमसाल्याने तयार केलेल्या ‘हेट स्टोरी ३’वर कथेवरून चित्रपटावर टीका होत असली तरी हॉट फार्म्युल्याने सामान्य प्रेक्षकांना खूश केले आहे. यामुळेच या चित्रपटाने पहिल्या वीकेण्डमध्ये २६ कोटींपेक्षा जास्त कमाई करून बॉक्स आॅफिसचे मैदान जिंकले आहे. २६ कोटींपेक्षा जास्तीची कमाई सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा आहे, कारण चित्रपटाचा एकूण खर्च १३ कोटींचा होता. या हिशेबाने बघितले तर चित्रपटाने गुंतविलेला पैसा वसूल करून तीन दिवसांत भरपूर नफाही कमावला आहे. प्रदर्शित होण्याच्या आदल्या दिवशी चित्रपटाची ओपनिंग ९ कोटींची झाली. ही कमाई फार चांगली समजली जाते. दुसऱ्या दिवशीची कमाई १८ कोटींची होती व तिसऱ्या दिवशीची जवळपास तेवढीच होती.
जाणकार मंडळी या चित्रपटाच्या कमाईचे जे आकडे समोर येत आहेत त्यावरून ‘तमाशा’ फार काही चांगली कामगिरी करू न शकल्याचा लाभ ‘हेट स्टोरी ३’ला झाला, असे म्हणत आहेत. शिवाय चित्रपटात कोणी मोठा नट नसल्यामुळे त्याच्या प्रमोशनवर खूप भर देणे, कमी चित्रपटगृहांत तो प्रदर्शित करणे व हॉट दृश्यांनी सामान्य प्रेक्षकांना खूश करण्याचे रसायन यशस्वी सिद्ध झाले आहे. समजले जाते ते हे की फार काही वेगळे घडले नाही तर चित्रपट सोमवारपासून स्थिर राहील व पुढील वीकेंडपर्यंत ५० कोटींची कमाई करेल. कारण येत्या शुक्रवारीही कोणताही मोठा म्हणावा असा चित्रपट प्रदर्शित होणार नाही. याचाच लाभ ‘हेट स्टोरी ३’ला मिळण्याची आशा आहे.
रणबीर कपूर आणि दीपिका पदुकोणच्या जोडीचा व दिग्दर्शक इम्तियाज अली यांच्या ‘तमाशा’बद्दल बोलायचे तर पहिल्या वीकेण्डमध्ये ३८ कोटींचा व्यवसाय ठाकठीक
समजला जात आहे. पुढील वीकेण्डपर्यंत तमाशाचा व्यवसाय ५५ कोटींपर्यंत गेला. याचा अर्थ येत्या सात दिवसांत चित्रपटाने २३ कोटींची कमाई केली.
या चित्रपटाचे बजेट ९० कोटींच्या जवळपास असल्याचे सांगितले जाते. अंदाज करता येईल की तमाशाने किती रुपयांचा तोटा होईल. जाणकार मानतात की पहिल्या तीन दिवसांत महानगरांतील मल्टिप्लेक्समध्ये तमाशाला चांगला प्रतिसाद लाभला परंतु सोमवारपासून गडबड झाली. सिंगल स्क्रीन चित्रपटगृहांत हा चित्रपट पहिल्या दिवसापासूनच ढेपाळला होता. येत्या शुक्रवारी नवा कोणताही चित्रपट प्रदर्शित होणार नसला तरी त्याचा फायदा तमाशाला झालेला नाही. राजश्रीचा ‘प्रेम रतन धन पायो’ने २०६ कोटी रुपयांची कमाई करून आता स्थैर्य मिळविले आहे.

Web Title: Hate Story 3 gets big success

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.