हॅप्पी न्यू इअरचा ओपनिंग रेकॉर्ड
By Admin | Updated: October 25, 2014 23:39 IST2014-10-25T23:39:50+5:302014-10-25T23:39:50+5:30
शुक्रवारी रिलीज झालेल्या हॅप्पी न्यू इअरला देशभरातील मल्टिप्लेक्स आणि सिंगल स्क्रिन चित्रपटगृहांत जबरदस्त ओपनिंग मिळाली आहे.

हॅप्पी न्यू इअरचा ओपनिंग रेकॉर्ड
शुक्रवारी रिलीज झालेल्या हॅप्पी न्यू इअरला देशभरातील मल्टिप्लेक्स आणि सिंगल स्क्रिन चित्रपटगृहांत जबरदस्त ओपनिंग मिळाली आहे. शुक्रवारी पहिल्या शोपासून या चित्रपटांना खूप चांगल्या प्रतिक्रिया मिळाल्या असून चित्रपटाने पहिल्याच दिवशी तब्बल 45 कोटींचा व्यवसाय केला आहे. रिलीजनंतर पहिल्याच दिवशी एवढी कमाई करणा:या या चित्रपटाने किक आणि धूम- 3 चा रेकॉर्ड मोडला आहे. चित्रपटाला परीक्षकांकडून संमिश्र प्रतिक्रिया मिळाल्या असल्या तरी प्रेक्षकांचा मात्र भरभरून प्रतिसाद मिळाला आहे. येत्या तीन दिवसांत हा चित्रपट शंभर कोटींचा पल्ला गाठण्याचे संकेत आहेत. आमिर खानच्या धूम 3 ने रिलीजच्या दिवशी 36 कोटी आणि सलमान खानच्या किकने 33.1क् कोटींचा व्यवसाय केला होता. या दोनही चित्रपटांचे रेकॉर्ड तोडत हॅप्पी न्यू इअरने पहिल्याच दिवशी जास्त कमाई करणा:या चित्रपटांच्या यादीत पहिला क्रमांक पटकावला आहे.