आराध्याची जमली बॉडीगार्डसोबत गट्टी...!
By Admin | Updated: June 10, 2016 15:38 IST2016-06-10T15:38:58+5:302016-06-10T15:38:58+5:30
ऐश्वर्या रॉय बच्चन आणि अभिषेक बच्चन यांची गोड मुलगी आराध्या ही आता चार वर्षांची झाली. ऐशला स्वत:चे करिअर आणि आराध्याचे शिक्षण या दोन्ही बाजू सांभाळतांना खुपच तारेवरची

आराध्याची जमली बॉडीगार्डसोबत गट्टी...!
>ऑनलाइन लोकमत
मुंबई, दि. १० - ऐश्वर्या रॉय बच्चन आणि अभिषेक बच्चन यांची गोड मुलगी आराध्या ही आता चार वर्षांची झाली. ऐशला स्वत:चे करिअर आणि आराध्याचे शिक्षण या दोन्ही बाजू सांभाळतांना खुपच तारेवरची कसरत करावी लागते. पण, आराध्याचे शिक्षण कुठल्याही अडचणीशिवाय व्यवस्थितपणे सुरळीत सुरु आहे. यात अनेकांचा पाठिंबा ऐशला मिळतोय. पती अभिषेक, सासू-सासरे जया-अमिताभ बच्चन यांच्यासह त्यांच्या घरचे सेक्युरिटी गार्ड आणि आराध्याचे बॉडीगार्ड हे देखील तितकेच महत्त्वाचे आहेत. आराध्याच्या बॉडीगार्ड्सना म्हणे तिला शाळेत सोडणे आणि परत घेऊन येणे फारच आवडते. ‘धीरूभाई अंबानी प्रि-प्रायमरी सेक्शन’ मध्ये ती शिक्षण घेत असून तिथे प्रचंड सेक्युरिटी असते. त्यांना तिथे बराच वेळ थांबावे लागते. पण, ते सर्व आराध्यासाठी सहन करतात. आराध्याही त्यांच्यासोबत चांगलीच मस्ती करते. त्यांच्यासोबत तिची चांगलीच गट्टी जमली आहे.