शिव-पार्वतीने लग्न केलेल्या मंदिरात गोविंदाच्या भाचीने दुसऱ्यांदा घेतले ७ फेरे, शेअर केला व्हिडीओ

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 30, 2025 17:30 IST2025-04-30T17:30:41+5:302025-04-30T17:30:54+5:30

याच मंदिरात झालेलं शिव-पार्वतीचं लग्न!

Govinda Niece Arti Singh's And Dipak Chauhan Marries Again At Historic Shiva-parvati Triyuginarayan Temple In Uttarakhand Shares Wedding Video | शिव-पार्वतीने लग्न केलेल्या मंदिरात गोविंदाच्या भाचीने दुसऱ्यांदा घेतले ७ फेरे, शेअर केला व्हिडीओ

शिव-पार्वतीने लग्न केलेल्या मंदिरात गोविंदाच्या भाचीने दुसऱ्यांदा घेतले ७ फेरे, शेअर केला व्हिडीओ

शिव-पार्वतीचे विवाहस्थान म्हणून ओळखलं जाणारं पवित्र त्रियुगीनारायण मंदिर उत्तराखंडच्या रुदप्रयाग जिल्ह्यात आहे. असे म्हणतात की याच ठिकाणी भगवान शिव आणि माता पार्वतीचा विवाह झाला होता.  हा परिसर आता विवाहस्थळ म्हणून उदयास येत आहे.  या मंदिरात अग्नी प्रदक्षिणा केल्याने पती-पत्नी जन्मजन्मांतरीचे सहचर होतात, त्यांच्या वैवाहिक जीवनात कधीही तणाव नसतो आणि त्याचे आयुष्य चांगले होते, अशी श्रद्धा या अद्भूत मंदिराविषयी आहे. या मंदिरात लग्नासाठी अनेक जोडपी दूरदूरवरून खास येतात. आता गोविंदाच्या भाचीने याच मंदिरात दुसऱ्यांदा ७ फेरे घेतले आहेत.

 गोविंदाची भाची  आणि अभिनेत्री आरती सिंग हिने गेल्या वर्षी दीपक चौहानशी मोठ्या थाटामाटात लग्न केलं होतं. आता अभिनेत्रीने लग्नाच्या पहिल्या वाढदिवसानिमित्त या प्राचीन मंदिरात पूर्ण विधींसह सात फेरे घेतले आहे.  आरती सिंहने सोशल मीडियावर एक व्हिडीओ शेअर करत भावनिक पोस्ट लिहली. तिनं कॅप्शनमध्ये लिहलं, त्रियुगीनारायण मंदिर, उत्तराखंड – जिथे भगवान शिव आणि देवी पार्वती यांचे लग्न झाले होते आणि आजही तिथे शाश्वत अग्नी जळत आहे. दीपकचे स्वप्न होते की आपण तिथे लग्न करावे आणि भगवान शिव आणि देवी पार्वतीचे आशीर्वाद घ्यावेत".


पुढे तिनं लिहलं, "तर आमच्या लग्नाच्या पहिल्या वाढदिवसानिमित्त आम्ही पुन्हा लग्न केलं. आमच्या लग्नाच्या दिवशी आम्ही जो पोशाख परिधान केला होत,  तोच पोशाख आताही परिधान केला. एक दिव्य अनुभव होता. माता पार्वती आणि भगवान शिव यांचा आशीर्वाद आम्हाला मिळो आणि प्रत्येक वाईट नजरेपासून रक्षण करोत. लग्नाचा पहिला वाढदिवस हा नेहमीच संस्मरणीय असतो आणि ही भावना आम्ही कधीही विसरणार नाही", या शब्दात तिनं आपल्या भावना व्यक्त केल्यात. 
 

Web Title: Govinda Niece Arti Singh's And Dipak Chauhan Marries Again At Historic Shiva-parvati Triyuginarayan Temple In Uttarakhand Shares Wedding Video

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.