पोलिसांच्या व्यथा मांडणारा ‘शासन’

By Admin | Updated: November 28, 2015 01:26 IST2015-11-28T01:26:22+5:302015-11-28T01:26:22+5:30

पोलीसदेखील माणूस आहे, त्यांच्याही स्वत:च्या काही गरजा आहेत. सध्याच्या परिस्थितीचा विचार करता एक लाख नागरिकांच्यापाठी पाचशे पोलीस आहेत

The government's governing authority | पोलिसांच्या व्यथा मांडणारा ‘शासन’

पोलिसांच्या व्यथा मांडणारा ‘शासन’

पोलीसदेखील माणूस आहे, त्यांच्याही स्वत:च्या काही गरजा आहेत. सध्याच्या परिस्थितीचा विचार करता एक लाख नागरिकांच्यापाठी पाचशे पोलीस आहेत, त्यामुळे त्यांना अतिरिक्त काम करावे लागते. गणेश उत्सव, नवरात्र; तसेच अनेक सणांमुळे, विविध ठिकाणी निघणाऱ्या मिरवणुका, व्हीआयपी पोलीस बंदोबस्त अशा विविध कारणांमुळे पोलिसांच्या उरल्यासुरल्या रजाही वाया जातात. अशा अनेक पोलिसांच्या समस्या गजेंद्र अहिरे दिग्दर्शित ‘शासन’ या चित्रपटातून दाखविण्यात आल्या आहेत. राजकारणावर आधारित हा चित्रपट लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येतोय.
शेखर पाठक प्रस्तुत आणि निर्मित या सिनेमात सिनेसृष्टीतल्या नामवंत कलाकार मंडळींची फौज पाहायला मिळणार आहे. आपल्या अभिनयाच्या जोरावर प्रेक्षकांची मने जिंकणारा सिद्धार्थ जाधव हाही या सिनेमाचा एक भाग आहे. राजकारण एक असा खेळ आहे की, त्यात प्रत्यक्ष-अप्रत्यक्षपणे सामान्य माणूस गुरफटला जातो. सामान्य नागरिक, तसेच कलाकार, नेतेमंडळी यांच्या संरक्षणासाठी कायम तत्पर असलेला पोलीस दल अनेकदा दुर्लक्षित केला जातो. त्यांची व्यथा मांडण्याचा प्रयत्न चित्रपटात करण्यात आला आहे. नरेंद्र भिडे यांनी सिनेमाला संगीत दिले आहे. श्रेया फिल्म्स या बॅनरखाली निर्मिती करण्यात आलेल्या सिद्धार्थ जाधव याच्यासह भरत जाधव, मकरंद अनासपुरे, जितेंद्र जोशी, मनवा नाईक, अदिती भागवत, वृंदा गजेंद्र, विक्रम गोखले, मोहन जोशी, नागेश भोसले, डॉ. श्रीराम लागू, अमेय धारे, किरण करमरकर अशा दिग्गज कलाकारांच्या अभिनयाची जुगलबंदी आपल्याला पाहायला मिळणार आहे.

Web Title: The government's governing authority

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.