स्केटिंग शिकायला गेली अन् जेनेलिया वहिनी धपकन् पडली, तरिही ‘पावरी’ सुरुच!! पाहा, व्हिडीओ

By ऑनलाइन लोकमत | Published: March 9, 2021 12:36 PM2021-03-09T12:36:23+5:302021-03-09T12:36:48+5:30

 ‘मेरी रिकव्हरी पावरी स्टोरी’ म्हणत, जेनेलिया डिसूजाने मजेदार तेवढाच प्रेरणादायी व्हिडीओ शेअर केला आहे.

Genelia D'Souza gives a glimpse of her 'recovery pawri story' as she gets injured while skating | स्केटिंग शिकायला गेली अन् जेनेलिया वहिनी धपकन् पडली, तरिही ‘पावरी’ सुरुच!! पाहा, व्हिडीओ

स्केटिंग शिकायला गेली अन् जेनेलिया वहिनी धपकन् पडली, तरिही ‘पावरी’ सुरुच!! पाहा, व्हिडीओ

Next
ठळक मुद्देजेनेलिया व रितेश दोघेही देशमुख सोशल मीडियावर खूप सक्रीय आहेत आणि ब-याचदा ते मीडियावर फोटो आणि व्हिडीओ शेअर करत असतात.  

जेनेलिया डिसूजा चित्रपटांत आताश: चित्रपटात दिसत नाही. पण सोशल मीडियावर मात्र तरी प्रचंड अ‍ॅक्टिव्ह दिसते. स्वत:चे मजेदार व्हिडीओ, फोटो शेअर करते. तिचे हे व्हिडीओ इतके मजेदार असतात की, क्षणात व्हायरल होतात. आत्ताही तिचा एक व्हिडीओ असाच व्हायरल होतोय. होय, जेनेलियाने स्वत: हा व्हिडीओ शेअर केला आहे. यात जेनेलिया स्केटिंग करताना दिसते आणि धडकन् पडते. पडल्यामुळे जेनेलियाच्या हाताला दुखापत झालीये. पण अशातही ‘मेरी रिकव्हरी पावरी स्टोरी’ म्हणत, तिने फनी व्हिडीओ शेअर केला आहे.

या व्हिडीओसोबत ती लिहिते, ‘काही आठवड्यांपूर्वी मी स्केटिंग शिकण्याचा निर्णय घेतला. मुलांसाठी प्रेरणा बनण्याची, त्यांना सोबत करण्याच्या इच्छेने मी स्केटिंग शिकण्याचा निर्णय घेतला. स्केटिंग शिकल्यानंतर इन्स्टावर त्याचे कूल व्हिडीओ शेअर करून मिरवण्याचीही इच्छा होतीच. पण मला वाटते, हा व्हिडीओही मी शेअर करायला हवा. अनेकदा उंच भरारी घेण्याआधी तुम्ही धडपडता, पडता. मी अपयशी ठरलीये, पण हिंमत अजून कायम आहे. मी पुन्हा प्रयत्न करेन आणि यश येत नाही, तोपर्यंत प्रयत्न करत राहीन... आशा करते, पुन्हा पडणार नाही.’

हिंदी चित्रपटसृष्टीतील क्युट कपल म्हणून रितेश  आणि जेनेलिया  या जोडीकडे पाहिले जाते. ‘तुझे मेरी कसम’ या सिनेमातून दोघांनी बॉलिवूडमध्ये पहिले पाऊल ठेवले आणि याच सिनेमातून दोघं आयुष्यभराचे जोडीदार बनले. रितेश व जेनिलिया यांच्या लग्नाला नुकतीच 8 वर्षे पूर्ण झाली आहेत.
जेनेलिया व रितेश दोघेही देशमुख सोशल मीडियावर खूप सक्रीय आहेत आणि ब-याचदा ते मीडियावर फोटो आणि व्हिडीओ शेअर करत असतात.  

Web Title: Genelia D'Souza gives a glimpse of her 'recovery pawri story' as she gets injured while skating

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.