गेल पाहणार मराठी चित्रपट
By Admin | Updated: October 31, 2015 00:36 IST2015-10-31T00:36:32+5:302015-10-31T00:36:32+5:30
नाव वाचून काही तरी चुकलंय असं वाटलं ना? पण ते खरंच आहे. मराठी इंडस्ट्रीला चांगले दिवस आले आहेत, असं म्हणताना आजवर अनेक अमराठी दिग्दर्शक आणि निर्माते मराठीत पदार्पण करत असल्याची बातमी

गेल पाहणार मराठी चित्रपट
नाव वाचून काही तरी चुकलंय असं वाटलं ना? पण ते खरंच आहे. मराठी इंडस्ट्रीला चांगले दिवस आले आहेत, असं म्हणताना आजवर अनेक अमराठी दिग्दर्शक आणि निर्माते मराठीत पदार्पण करत असल्याची बातमी अनेकदा तुम्ही वाचली असेलच. पण आता फक्त अमराठी कलाकार, दिग्दर्शक, निर्मातेच नाही तर चक्क वेस्ट इंडिजचा आघाडीचा खेळाडू ख्रिस गेललाही मराठी चित्रपटाचे आकर्षण वाटू लागले आहे, असं म्हटलं तर चूक ठरणार नाही. कारण चित्रपट प्रदर्शित होण्यापूर्वीच दोन दिवस त्याने सोशल मीडियावर हे अपडेट केलं आहे, की ‘मी उद्या जेव्हा भारतात असेन तेव्हा मराठी चित्रपट पाहायला जाणार आहे.’ आहे की नाही तुमच्या आमच्यासाठी आणि मराठी इंडस्ट्रिसाठी मोठ्ठं सरप्राइज...