गौरीच्या आठवणी झाल्या जाग्या

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 15, 2016 11:31 IST2016-04-15T18:24:47+5:302016-04-15T11:31:43+5:30

जीवनातील काही खास क्षण कैद केले असतील तर त्यांना पुन्हा उजाळा देण्यासाठी आपण सगळेच त्या त्या फोटो अल्बममधून जुन्या ...

Gauri remembers his memories | गौरीच्या आठवणी झाल्या जाग्या

गौरीच्या आठवणी झाल्या जाग्या

वनातील काही खास क्षण कैद केले असतील तर त्यांना पुन्हा उजाळा देण्यासाठी आपण सगळेच त्या त्या फोटो अल्बममधून जुन्या व खास आठवणींना पुन्हा उजाळा देऊन त्यामध्ये रमून जातो. अशाच काही जुन्या आठवणींना उजाळा दिला स्वप्नांच्या पलीकडे या मालिकेतून महाराष्ट्राच्या घराघरात पोहोचलेली वैदयही म्हणजेच सर्वाची लाडकी सून गौरी नलावडे हिने. ती काही महिन्यापूर्वी फ्रेंडस या मराठी चित्रपटातूनदेखील झळकली होती. सध्या या सुंदर अभिनेत्रीने तिचे काही खास क्षण कैद केलेला फोटो सोशलमिडीयावर अपलोड केलेला आहे. या फोटोने तिला फॉरेन ट्रीपची आठवण करून दिलेली दिसते. तसेच  स्वप्नांच्या पलीकडे या मालिकेत नेहमी तिला साडीमध्ये पाहिले होते. पण तिने अपलोड केलेला फोटोमधला तिचा  एकदम झक्कास लूक पाहून तुम्हाला ही आश्चर्य वाटेल. कारण यामध्ये ती एकदम वेस्टर्न लूक कॅरी करताना दिसत आहे. तिने परिधान केलेल्या पिंक वन पीसमध्ये हॉट व गॉजस दिसत आहे. तिचे हे सौदर्य पाहता, असेच म्हणावे लागेल की लडकी ब्यूटीफूल कर गयी चूल. 

Web Title: Gauri remembers his memories

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.