गौरी झाली ग्रॅज्युएट

By Admin | Updated: March 3, 2017 02:52 IST2017-03-03T02:52:32+5:302017-03-03T02:52:32+5:30

‘यलो’ सिनेमात आपल्या अभिनयाने साऱ्यांची मने जिंकणारी आणि याच अभिनय गुणांसाठी राष्ट्रीय पुरस्कारातील स्पेशल ज्युरी पुरस्कार मिळवणारी गौरी गाडगीळ.

Gauri graduated Graduate | गौरी झाली ग्रॅज्युएट

गौरी झाली ग्रॅज्युएट


‘यलो’ सिनेमात आपल्या अभिनयाने साऱ्यांची मने जिंकणारी आणि याच अभिनय गुणांसाठी राष्ट्रीय पुरस्कारातील स्पेशल ज्युरी पुरस्कार मिळवणारी गौरी गाडगीळ. स्पेशल चाईल्ड असलेल्या गौरीचं महाराष्ट्रातल्या नाहीच तर देशविदेशांतल्या तमाम रसिकांनी कौतुक केलं. आता याच गौरीनं आपल्या आयुष्यातील एक महत्त्वाचा टप्पा पार केलाय. शिक्षणाची ओढ असणाऱ्या गौरीने पदवी मिळवली आहे. कला आणि समाजशास्त्र या विषयांत गौरीनं पदवी मिळवली आहे. गौरीने पदवी मिळवल्याची शुभवार्ता अभिनेत्री मृणाल कुलकर्णी यांनी रसिकांना दिलीय. ‘फेसबुक’ वर याबाबत त्यांनी पोस्ट टाकून गौरीचं कौतुक केलं आहे. ‘आपली गौरी गाडगीळ आता ग्रॅज्युएट झाली आहे. कला आणि समाजशास्त्र विषय घेऊन तिने ही पदवी मिळवली आहे. खरंच खूप खूप अभिमान वाटतोय. गौरी आणि तिची रियल आयुष्यातील आई स्नेहा हे खरे हिरो आहे. यांत तिच्या वडिलांचे आणि धाकट्या बहिणीचंही योगदान कुणीही विसरू शकत नाही. खरंच खूप खूप ग्रेट कुटुंब. गाडगीळ कुटुंबाचं मनापासून खूप खूप अभिनंदन’ अशी पोस्ट फेसबुकवर टाकून मृणाल कुलकर्णी यांनी रसिकांना खुशखबर दिली आहे. या पोस्टनंतर गौरीवर सोशल मीडियावर अभिनंदन आणि कौतुकाचा वर्षावर होत आहे.

Web Title: Gauri graduated Graduate

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.