गणेश आचार्यने दीड वर्षात घटवलं 85 किलो वजन
By Admin | Updated: July 7, 2017 09:34 IST2017-07-07T09:34:05+5:302017-07-07T09:34:05+5:30
राष्ट्रीय पुरस्कार विजेते नृत्य दिग्दर्शक गणेश आचार्य याने दीड वर्षात तब्बल 85 किलो वजन घटवलं आहे.

गणेश आचार्यने दीड वर्षात घटवलं 85 किलो वजन
ऑनलाइन लोकमत
मुंबई, दि. 7- हिंदी सिनेसृष्टीत अनेकदा सिनेमा हीट झाला नाही तरी त्या सिनेमातील गाणी हीट होत असतात. गाण्याला चांगलं संगीत असेल किंवा त्या गाण्याला उत्तम नृत्याची साथ असेल तर प्रेक्षकांच्या ते नेहमीच लक्षात राहतं. सिनेमा आणि गाणी यांचं जसं समीकरण आहे तसंच नृत्य आणि गणेश आचार्य हे समिकरण बॉलिवूडमध्ये गेल्या अनेक वर्षांपासून सुरू आहे. नृत्य दिग्दर्शक गणेश आचार्य त्यांनी शिकविलेल्या नृत्यामुळे नेहमीत प्रेक्षकांना थक्क करत असतो. पण आता एका वेगळ्या कारणाने त्यांचे फॅन्स पूर्णपणे आश्चर्यचकीत झाले आहेत. ते कारण म्हणजे गणेश आचार्य यांनी घटविलेलं वजन. राष्ट्रीय पुरस्कार विजेते नृत्य दिग्दर्शक गणेश आचार्य याने दीड वर्षात तब्बल 85 किलो वजन घटवलं आहे. त्याच्या आधीच्या वजनापेक्षा निम्म वजन त्यांनी घटवलं आहे. त्यांच्या नव्या लूकचे फोटो सोशल मीडियावर व्हायरलही झाले आहेत.