'गदर'साठी अमिषा पटेल नाही तर ऐश्वर्या होती पहिली पसंती?, दिग्दर्शक खुलासा करत म्हणाला- माझ्या डोक्यात....

By ऑनलाइन लोकमत | Published: September 29, 2023 12:46 PM2023-09-29T12:46:50+5:302023-09-29T12:50:36+5:30

गदरनंतर तब्बल २१ वर्षानंतर गदर २ हा सिनेमा प्रेक्षकांच्या भेटीला आला. दिग्दर्शक अनिल शर्मा यांनी या सिनेमाची घोषणा केल्यापासून तो सातत्याने चर्चेत येत होता

Gadar 2 director anil sharma reveals on aishwarya rai bachchan and kajol casting as sakeena ameesha patel | 'गदर'साठी अमिषा पटेल नाही तर ऐश्वर्या होती पहिली पसंती?, दिग्दर्शक खुलासा करत म्हणाला- माझ्या डोक्यात....

'गदर'साठी अमिषा पटेल नाही तर ऐश्वर्या होती पहिली पसंती?, दिग्दर्शक खुलासा करत म्हणाला- माझ्या डोक्यात....

googlenewsNext

बॉलिवूड अभिनेता सनी देओल (Sunny Deol) याचा गदर २ हा सिनेमा सध्या  बॉक्स ऑफिसवर तुफान कमाई करतोय. तब्बल २२ वर्षानंतर रिलीज झालेल्या या सिनेमाने बॉक्स ऑफिसवर या ४९ दिवसांमध्ये ५२५ कोटींचा गल्ला जमवला आहे. तर, या सिनेमाने वर्ल्डवाइड ६८५ कोटींची कमाई केली आहे. विशेष म्हणजे केवळ ७५ कोटींमध्ये तयार झालेल्या या सिनेमाने तगडी कमाई केली आहे. एकीकडे सिनेमाच्या यशाचं कौतुक होत असताना दुसरीकडे दिग्दर्शक अनिल शर्मा सिनेमासंबंधीत अनेक खुलासे करतायेत. 

सिनेमातील तारा सिंग आणि सकिनाची जोडी प्रेक्षकांना खूप आवडली. सिनेमात सकिनाची भूमिका अमिषा पटेलने साकारली होती. पण सकीनाच्या भूमिकेसाठी अमिषा पटेल पहिली पसंती नसल्याचा खुलासा दिग्दर्शक अनिल शर्मा यांनी केला, 

अलिकडेच एका मुलखतीत अनिल शर्मा म्हणाले, गदरच्या वेळी त्यांच्या डोक्यात अनेक अभिनेत्रीची नाव होती. त्यांनी 2-3 अभिनेत्रींना स्क्रिप्ट सांगितली, त्यापैकी काहींना ती आवडलीही. त्यात ऐश्वर्या राय बच्चन आणि काजोलचाही समावेश होता. मात्र, त्या अभिनेत्रींनी गदरमध्ये काम करण्यास नकार देत हा सिनेमा रिजेक्ट केला.

 अनिल पुढे म्हणाले, त्यानंतर झी स्टुडिओचे एका अभिनेत्रीशी बोलणं झालं होते जिने सकिनाची भूमिका साकारण्यास होकार दिला होता पण ती खूप पैसे घेत होती. चित्रपटाचे बजेट खूपच कमी होते, त्यामुळे निर्मात्यांनी मला अमरीश पुरी किंवा अभिनेत्री यांच्यापैकी एक निवडण्यास सांगितले. अमरीश पुरी खूप महत्त्वाचे होते, त्यांच्याशिवाय चित्रपट बनू शकला नसता. 
 

Web Title: Gadar 2 director anil sharma reveals on aishwarya rai bachchan and kajol casting as sakeena ameesha patel

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.