कुस्तीच्या आखाड्यातून ही तरुणी पोहचली थेट मालिकेच्या सेटवर, अभिनय क्षेत्रात केलं पदार्पण

By ऑनलाइन लोकमत | Published: June 27, 2023 09:33 AM2023-06-27T09:33:02+5:302023-06-27T09:33:15+5:30

Prajakta Chavan : बालपणापासूनच कुस्तीच्या आखाड्यात वावरणारी प्राजक्ता चव्हाण आता नायिका बनून मालिकेचा आखाडा गाजवणार आहे.

From the wrestling arena, this young lady reached the set of the serial and made her acting debut | कुस्तीच्या आखाड्यातून ही तरुणी पोहचली थेट मालिकेच्या सेटवर, अभिनय क्षेत्रात केलं पदार्पण

कुस्तीच्या आखाड्यातून ही तरुणी पोहचली थेट मालिकेच्या सेटवर, अभिनय क्षेत्रात केलं पदार्पण

googlenewsNext

बालपणापासूनच कुस्तीच्या आखाड्यात वावरणारी प्राजक्ता चव्हाण (Prajakta Chavan) आता नायिका बनून मालिकेचा आखाडा गाजवणार आहे. ती सोनी मराठी वाहिनीवरील तुझं माझं सपान (Tuza Maza Sapan) या मालिकेत काम करते आहे. या मालिकेत दोन पैलवानांची प्रेम कहाणी पाहायला मिळत आहे. प्राजक्ता आणि वीरेंद्र हे दोन पैलवान सध्या एकमेकांच्या विरोधात वावरत आहेत. मात्र त्यांची केमिस्ट्री कशी जुळणार हे येत्या काही दिवसातच प्रेक्षकांना पाहायला मिळणार आहे. तुझं माझं सपान या मालिकेतून प्राजक्ता आणि विरुची दमदार जोडी झळकत आहे. ही भूमिका अभिनेता संकेत निकम आणि प्राजक्ता चव्हाण हिने साकारलेली आहे.

संकेत निकम हा अभिनेता आहे. त्याने काही हिंदी प्रोजेक्टसाठी सहाय्यक दिग्दर्शक म्हणून काम केलेले आहे. कॉलेज मस्ती, इंद्रारी, जय शिवराय अशा प्रोजेक्टमधून तो झळकला आहे. तर मालिकेची नायिका प्राजक्ता चव्हाण ही खऱ्या आयुष्यात सुद्धा पैलवानच आहे. प्राजक्ता बालपणापासूनच कुस्तीचे धडे गिरवते. त्यामुळे तीचे पालनपोषण एका मुलाप्रमाणेच झालेलं आहे. अगदी डोक्याला टक्कल करण्यापासून ते पॅन्ट शर्ट मध्येच ती कायम वावरली आहे. त्यामुळे मालिकेतला तिचा साडीतला लूक पाहून तिच्या आईवडिलांनी, ही तूच आहेस का? अशी प्रतिक्रिया दिली होती.

अभिनयाचे गिरवावे लागले धडे

प्राजक्ता ही मूळची साताऱ्याची असून तिने कुस्तीमध्ये आजवर राज्यस्तरीय पातळीवर उत्तम कामगिरी बजावलेली आहे. या मालिकेसाठी तिची निवड करण्यात आली त्यावेळी ती नायिका बनलीये यावर तिचा विश्वासच बसला नव्हता. या सर्व गोष्टी तिला स्वप्नवत वाटत होत्या. प्राजक्ताच्या भूमिकेसाठी तिला काही विशेष मेहनत घ्यावी लागत आहे. कारण कुस्तीच्या आखाड्यात वावरलेल्या प्राजक्ताला अभिनय शिकावा लागत आहे. यासाठी तिने प्रशिक्षण देखील घेतलेले आहे. याशिवाय सहकलाकार आणि मालिकेच्या टीम कडून तिला चांगले सहकार्य सुद्धा मिळत आहे. 
 

Web Title: From the wrestling arena, this young lady reached the set of the serial and made her acting debut

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.