पहिला सिनेमा वडिलांसोबत नाहीच
By Admin | Updated: September 14, 2015 03:26 IST2015-09-14T03:26:02+5:302015-09-14T03:26:02+5:30
कुठल्याही स्टार्सचा मुलगा किंवा मुलगी फिल्म इंडस्ट्रीत एन्ट्री करणार असेल तर ते त्यांच्या पहिल्याच चित्रपटात वडिलांसोबत पडद्यावर येत आहेत का, याबाबत प्रेक्षकांमध्ये कमालीची उत्सुकता असते.

पहिला सिनेमा वडिलांसोबत नाहीच
कुठल्याही स्टार्सचा मुलगा किंवा मुलगी फिल्म इंडस्ट्रीत एन्ट्री करणार असेल तर ते त्यांच्या पहिल्याच चित्रपटात वडिलांसोबत पडद्यावर येत आहेत का, याबाबत प्रेक्षकांमध्ये कमालीची उत्सुकता असते. परंतु साधारणत: असे घडत नाही. काल-परवाच प्रदर्शित झालेल्या हीरो या चित्रपटात सूरज पांचोली आपल्या पप्पांसोबत स्क्रीन शेअर करीत असला तरी अशी उदाहरणं फारच कमी आहेत. याआधी लव्हस्टोरीमध्ये कुमार गौरवने आपले वडील राजेंद्र कुमार यांच्यासोबत काम केले, तर शशी कपूर यांनी आपला मुलगा कुणालसोबत ‘विजेता’ं चित्रपटात काम केले. ही दोन दुर्मीळ उदाहरणे सोडल्यास अनेक स्टार्सनी सिनेमात आपल्या मुलामुलींसोबत काम करणे टाळले आहे.
- ंल्ल४्न.ं’ंल्ल‘ं१@’ङ्म‘ें३.ूङ्मे
आपल्या मुलीसोबत चित्रपटात काम करणार का या प्रश्नावर सुनील शेट्टी यांनी स्पष्टपणे सांगितले की, ते यापासून दूर राहतील. सुनील शेट्टी यांची मुलगी आथिया हिचा पहिला चित्रपट ‘हीरो’ शुक्रवारी प्रदर्शित होतो आहे. याबाबत शेट्टी यांना प्रश्न विचारण्यात आला होता. सोबत काम केल्याने मनावर दडपण येते, ज्यामुळे कामावर परिणाम होतो, असेही सुनील शेट्टी यांनी सांगितले. याच चित्रपटात आथियासोबत काम करणाऱ्या सूरज पांचोलीचेही पदार्पण होत आहे. सूरज आपल्या पहिल्या चित्रपटात वडील आदित्य पांचोलीसोबत काम करीत आहे.
चित्रपटाच्या इतिहासात कोणत्याही नवागत अभिनेत्याने आपल्या पहिल्या चित्रपटात वडिलांसोबत काम केल्याची उदाहरणे अगदी थोडी आहेत. कित्येक वर्षे काम केल्यानंतरही वडील आणि मुले एकाही चित्रपटात काम करीत नाहीत, अशी बरीच उदाहरणे आहेत. अनिल कपूरने आजपर्यंत आपली मुलगी सोनम कपूरसोबत काम केलेले नाही. शत्रुघ्न सिन्हाने सोनाक्षी सिन्हासोबत आजपर्यंत एकाही चित्रपटात काम केलेले नाही. विवेक ओबेरॉयने आपले वडील सुरेश ओबेरॉय यांच्यासोबत कधीही काम केले नाही. तुषार कपूरचे करिअर जवळपास संपुष्टात आले आहे. तो कधीही आपले वडील जितेंद्रसोबत पडद्यावर दिसून आला नाही. जॅकी श्रॉफचा मुलगा टायगरचा चित्रपट हीरोपंती प्रदर्शित झाला. जॅकीने यापासून दूर राहण्याचा निर्णय घेतला. रणवीर कपूरने बऱ्याच कालावधीनंतर अभिनव कश्यप यांच्या ‘बेशर्म’ चित्रपटात वडील ऋषी कपूर आणि आई नीतूसोबत काम केले, तरीही हा चित्रपट साफ आपटला. शाहीद कपूर आपले वडील पंकज कपूरसोबत चित्रपट करीत आहे. परंतु आपल्या पहिल्याच चित्रपटात मात्र ते कधीही सोबत आलेले नाहीत. स्टर्सचा वडिलांसोबत काम करण्याचा अनुभव चांगला नाही. पहिल्या चित्रपटात तर काम करण्याचा अनुभव वाईटच. हीरो चित्रपटाच्या बाबतीत जर काही गडबड झाली तर लोक पांचोली पितापुत्राला जबाबदार धरतील. चित्रपट यशस्वी ठरला तर मात्र तो एक इतिहास होईल.