रेट्रो पोस्टर असणारा पहिलाच मराठी चित्रपट
By Admin | Updated: August 4, 2016 01:59 IST2016-08-04T01:59:23+5:302016-08-04T01:59:23+5:30
चित्रपटाचे पोस्टर जास्तीत जास्त लोकांनी पाहावे यासाठी चित्रपटाचे निर्माते त्या चित्रपटातील सर्व कलाकारांना त्यांच्या लूकमध्ये झळकवण्याचा प्रयत्न करतात.

रेट्रो पोस्टर असणारा पहिलाच मराठी चित्रपट
चित्रपटाचे पोस्टर जास्तीत जास्त लोकांनी पाहावे यासाठी चित्रपटाचे निर्माते त्या चित्रपटातील सर्व कलाकारांना त्यांच्या लूकमध्ये झळकवण्याचा प्रयत्न करतात. मात्र, पोस्टरमध्ये असे काहीही न करता केवळ चित्रपटाची कथा आणि आशयाचा विचार करून रेट्रो पोस्टर तयार करणारा ‘डिस्को सन्या’ हा पहिलाच मराठी चित्रपट आहे. विशेष म्हणजे बॉलीवूडमधील रईसचे पोस्टर तयार करून त्यावर व्हेरी व्हेरी कूल...थँक यू अशी शाहरूख खानची वाहवा मिळवलेले मराठमोळे पोस्टर डिझायनर राजेश घाडिगावकर यांनी ‘डिस्को सन्या’चे पोस्टर तयार केले आहे. या पोस्टरवर ना कोणता चॉकलेट हीरो, ना कोणती हीरोइन... मात्र या पोस्टरवर डिस्को सन्याच्या अनोख्या विश्वाचा अंदाज येईल अशी कलाकृती करून प्रेक्षकांना आकर्षित करण्यात आले आहे. फुटपाथवर राहणाऱ्या एका खट्याळ मुलाच्या जय चिंगाबुंगा स्पिरीटची कहाणी या चित्रपटात पाहायला मिळणार आहे. मनोरंजनाच्या माध्यमातून प्रेक्षकांमधली माणुसकी जागा करणारा डिस्को सन्या ५ आॅगस्ट रोजी प्रेक्षकांच्या भेटीस येणार असून सर्व प्रेक्षकांमध्ये याविषयी उत्सुकता आहे.