श्रीदेवीच्या 'मॉम' सिनेमाचा फर्स्ट लूक रिलीज

By Admin | Updated: March 14, 2017 13:42 IST2017-03-14T13:42:11+5:302017-03-14T13:42:11+5:30

गौरी शिंदेच्या 'इंग्लिश विग्लिंश' सिनेमातून इंडस्ट्रीमध्ये दमदार पर्दापण करणारी बॉलिवूडची मिस हवा-हवाई श्रीदेवीचा आगामी सिनेमा 'मॉम'चा फर्स्ट लूक रिलीज करण्यात आला आहे.

First Look of Sridevi's 'Mum' cinema release | श्रीदेवीच्या 'मॉम' सिनेमाचा फर्स्ट लूक रिलीज

श्रीदेवीच्या 'मॉम' सिनेमाचा फर्स्ट लूक रिलीज

ऑनलाइन लोकमत

मुंबई, दि. 14 - गौरी शिंदेच्या  'इंग्लिश विग्लिंश' सिनेमातून इंडस्ट्रीमध्ये दमदार पर्दापण करणारी बॉलिवूडची मिस हवा-हवाई श्रीदेवीचा आगामी सिनेमा 'मॉम'चा फर्स्ट लूक रिलीज करण्यात आला आहे. या सिनेमात श्रीदेवी पुन्हा एकदा 'आई'च्या भूमिकेत दिसणार आहे. सिनेमाचा फर्स्ट लूक असलेला पोस्टर श्रीदेवीनं सोशल मीडियावर ट्विटरवर शेअर केला आहे. या पोस्टरवर वेगवेगळ्या भाषांमध्ये 'मां' असे लिहिलेलं दिसत आहे.  
 
या सिनेमाचे दिग्दर्शन रवी उद्यावर यांनी केलं असून सिनेमाचे निर्माते बोनी कपूर आहेत. या सिनेमात अक्षय खन्ना, अभिमन्यू सिंह यांच्याही महत्त्वाच्या भूमिका आहेत. तर सिनेमामध्ये नवाजुद्दीन सिद्दीकी पाहुणा कलाकार म्हणून दिसणार आहे. 
याव्यतिरिक्त सिनेमामध्ये दोन पाकिस्तानी कलाकारांचाही समावेश आहेत. अदनान सिद्दीकी आणि सजल अली अशी या पाकिस्तानी कलाकारांची नावं आहेत. 
(HAPPY BIRTHDAY : मिस्टर परफेक्शनिस्ट आमिर खानचा सफरनामा)
(VIDEO: 'बाहुबली-2' च्या ट्रेलरची पहिली झलक पाहिली का?)
(VIDEO : अनुष्काने प्रेस कॉन्फरन्स थांबवत उचलला रिपोर्टरच्या आईचा फोन)
दरम्यान, हा सिनेमा हिंदी भाषेसोबत तामिळ आणि तेलुगु भाषांमध्ये 14 जुलैला बॉक्सऑफिसवर रिलीज करण्यात येणार आहे. 
 

Web Title: First Look of Sridevi's 'Mum' cinema release

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.