ऋचा चढ्ढाच्या आगामी ‘लव सोनिया’चा पहिला लूक

By Admin | Published: December 31, 2016 03:21 AM2016-12-31T03:21:26+5:302016-12-31T03:21:26+5:30

बॉलिवूडमध्ये आपल्या अभिनयाच्या बळावर बॉलिवूडमध्ये वेगळे स्थान निर्माण करणारी ऋचा चढ्ढा ही आगामी इंडो-अमेरिकन ‘लव सोनिया’ या चित्रपटात महत्त्वाची भूमिका

The first Look of Richa Chaddha's forthcoming "Love Sonia" | ऋचा चढ्ढाच्या आगामी ‘लव सोनिया’चा पहिला लूक

ऋचा चढ्ढाच्या आगामी ‘लव सोनिया’चा पहिला लूक

googlenewsNext

बॉलिवूडमध्ये आपल्या अभिनयाच्या बळावर बॉलिवूडमध्ये वेगळे स्थान निर्माण करणारी ऋचा चढ्ढा ही आगामी इंडो-अमेरिकन ‘लव सोनिया’ या चित्रपटात महत्त्वाची भूमिका साकारत आहे. या चित्रपटात ती जी भूमिका साकारत आहे त्याचा फोटो व्हायरल होत आहे. यात ती मानवी तस्करीचा बळी ठरलेल्या महिलेची भूमिके त दिसणार आहे. दिग्दर्शक डेव्हिड वोमार्क यांच्या लव सोनिया या चित्रपटाचे शूटिंग भारतात व अमेरिकेत होत आहे. अभिनेत्री ऋचा चड्ढा हिने आपला लॉस एंजल्स येथील शूटिंग शेड्युल पूर्ण केला असून ती भारतात परतली आहे. आपल्या भूमिकेला न्याय देण्याचा आटोकाट प्रयत्न करणाऱ्या ऋचाने यासाठी कठोर प्रयत्न केले असणार यात शंका नाही. तिच्या या आगामी चित्रपटाचा एक फोटो सध्या व्हायरल होत आहे. हा फोटो तिने आतापर्यंत साकारलेल्या भूमिकेहून वेगळा दिसतो. चित्रपटाच्या शूटिंग लोकेशनवर काढण्यात आलेल्या या फोटोमध्ये ती शॉट समजावून घेताना दिसत आहे. विशेष म्हणजे तिच्या हातात बांगड्या दिसत आहेत. यामुळे ती भारतातील ग्रामीण भागातील महिलेची भूमिका साकारत असेल असे समजण्यास हरकत नाही. डेव्हिड वोमार्क यांचा महत्त्वकांक्षी चित्रपट असल्याने यासाठी ते देखील विशेष प्रयत्न करताना दिसत आहे. दिग्दर्शक डेव्हिड वोर्माक यांच्या ‘लव सोनिया’ या चित्रपटाची अनेकांना चांगलीच उत्सुकता लागली आहे. हा चित्रपट मानवी तस्करी व त्याची क्रूर वास्तिवकता या संवेदनशील विषयावर आधारित असल्याने अभिनेत्यांची निवड करताना आतापर्यंतच्या त्यांच्या अभिनयाचा मागोवा घेतला होता.

Web Title: The first Look of Richa Chaddha's forthcoming "Love Sonia"

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.