‘सरकार 3’चा फर्स्ट लूक
By Admin | Updated: October 20, 2016 02:16 IST2016-10-20T02:16:08+5:302016-10-20T02:16:08+5:30
आगामी चित्रपट ‘सरकार 3’ विषयी असेच म्हणता येईल. चित्रपटातील प्रत्येक कलाकारासोबत राम गोपाल वर्मा यांनी एकत्र भेट घालून दिली.

‘सरकार 3’चा फर्स्ट लूक
राम गोपाल वर्मा यांच्यासाठी हे वर्ष फारसे यशस्वी ठरले नाही. पण तुम्ही काहीही म्हणा, राम गोपाल वर्मा जे काही करतात, ते स्टाईलमध्ये करतात. त्यांचा आगामी चित्रपट ‘सरकार 3’ विषयी असेच म्हणता येईल. चित्रपटातील प्रत्येक कलाकारासोबत राम गोपाल वर्मा यांनी एकत्र भेट घालून दिली. ती सुद्धा एक नाही, दोन नाही तर तीन तीन लूकसह. तब्बल ८ वर्षांनंतर सुपरहिट ‘सरकार’चा तिसरा पार्ट येतो आहे. तेही सहा सुपरस्टार्ससह. अमिताभ बच्चन, जॅकी श्रॉफ, मनोज वाजपेयी, रोनित राय, अमित साध, रोहिणी हट्टंगडी आणि यामी गौतम अशी तगडी स्टारकास्ट आहे. यात अमिताभ एकदम नव्या भूमिकेत दिसणार आहेत.