अखेर तोडली ‘चुप्पी’!
By Admin | Updated: December 11, 2015 01:31 IST2015-12-11T01:31:15+5:302015-12-11T01:31:15+5:30
‘बाजीराव मस्तानी’ मधील अभिनेता रणवीर सिंग आणि दीपिका पदुकोन यांनी चित्रपटाविषयी सुरू असलेल्या वैचारिक संघर्षाची ‘चुप्पी’ तोडली. बाजीराव पेशव्यांचे वारसदार यांनी चित्रपटात करण्यात

अखेर तोडली ‘चुप्पी’!
‘बाजीराव मस्तानी’ मधील अभिनेता रणवीर सिंग आणि दीपिका पदुकोन यांनी चित्रपटाविषयी सुरू असलेल्या वैचारिक संघर्षाची ‘चुप्पी’ तोडली. बाजीराव पेशव्यांचे वारसदार यांनी चित्रपटात करण्यात आलेल्या अवास्तव चित्रीकरणाला विरोध केला आहे. त्यामुळे संजय लीला भन्साळी आणि टीम खुपच चिंतीत आहे. याविषयी बोलताना दीपिका म्हणाली,‘ संजय लीला भन्साळी कधीही प्रेक्षकांना दु:खी करण्यासाठी चित्रपट बनवत नाहीत. बाजीरावांच्या कारकिर्दीविषयी सामान्यांना ओळख करून देण्यासाठी चित्रपट बनवला आहे. ही लव्हस्टोरी बाजीरावांच्या आयुष्यातील काही घटनांना पूर्ण करण्यासाठी बनवण्यात आली आहे. ’ अशाच प्रकारची प्रतिक्रिया रणवीरनेही मांडली. बऱ्याच दिवसांपासून चित्रपटाला होत असणारा विरोध यामुळे संपूर्ण टीम मुग गिळून गप्प होती. आता दीपिका-रणवीरच्या निमित्ताने सर्व प्रश्नांची उकल झाली.