‘ठग आॅफ हिंदुस्तान’मधून फातिमा आऊट!
By Admin | Updated: March 11, 2017 02:52 IST2017-03-11T02:52:27+5:302017-03-11T02:52:27+5:30
आमिर खानची आॅनस्क्रीन मुलगी फातिमा सना शेख ‘दंगल’ रिलीज होऊन तीन महिने झाले तरी चर्चेत आहे. चर्चा कशाची तर ‘ठग आॅफ हिंदुस्तान’मध्ये ती आमिरसोबत स्क्रीन शेअर

‘ठग आॅफ हिंदुस्तान’मधून फातिमा आऊट!
आमिर खानची आॅनस्क्रीन मुलगी फातिमा सना शेख ‘दंगल’ रिलीज होऊन तीन महिने झाले तरी चर्चेत आहे. चर्चा कशाची तर ‘ठग आॅफ हिंदुस्तान’मध्ये ती आमिरसोबत स्क्रीन शेअर करणार याची. पण आता फातिमा आणि फातिमाच्या चाहत्यांच्या आनंदावर पाणी फेरणारी एक बातमी आहे.
सुत्रांनुसार, ‘ठग आॅफ हिंदुस्तान’चा निर्माता आमिर खान याने आपल्या चित्रपटात फातिमाला घेण्यास नकार दिला आहे. या बिग बजेट सिनेमाच्या एका ड्रिम सीक्वेंससाठी आमिरने फातिमाचे नाव सुचवले होते. पण आदित्यने आमिरची ही शिफारस फारशी गंभीरपणे घेतली नसल्याचे कळतेय.
‘ठग आॅफ हिंदुस्तान’ची कथा स्वातंत्र्यापूर्वीच्या ठगबाजांवर आधारित आहे. अॅक्शन आणि थ्रीलरने भरलेल्या या चित्रपटात मेगास्टार अमिताभ बच्चन हेही महत्त्वपूर्ण भूमिकेत आहेत. ‘ठग आॅफ हिंदुस्तान’मधील भूमिकेसाठी सर्वात आधी आलिया भट्ट आणि वाणी कपूरचे नाव चर्चेत होते. आलियाच्या नावावरून आमिर आणि आदित्य चोप्रा यांच्यात मतभेद निर्माण झाल्याचीही चर्चा होती. आमिरला या चित्रपटात आलिया हवी होती. तर आदित्य चोप्रा याला वाणी कपूर. अर्थात डेट्स जुळत नसल्याने आलिया स्वत: या चित्रपटातून अंग काढून घेतले. उरली वाणी कपूर तर तिनेही मी या चित्रपटात नाही, असे साफ जाहिर केले. त्यानंतर श्रद्धा कपूरच्या नावाची चर्चा सुरू झाली. श्रद्धाने या चित्रपटासाठी लूक टेस्ट दिल्याचेही सांगितले गेले. केवळ श्रद्धाच नाही तर ‘कुमकुम भाग्य’फेम मृणाल ठाकूर हिचे नावही समोर आले. यानंतर फातिमा यात दिसणार, अशी बातमी आली. पण आता ती सुद्धा आऊट झाली.