संगीतकार ए आर रेहमानविरोधात फतवा
By Admin | Updated: September 11, 2015 12:56 IST2015-09-11T11:06:04+5:302015-09-11T12:56:00+5:30
ख्यातनाम संगीतकार ए आर रेहमान व सिनेनिर्माते माजिद माजिदी यांच्याविरोधात मुंबईतील सुन्नी मुस्लीम गटाने फतवा काढला आहे.

संगीतकार ए आर रेहमानविरोधात फतवा
ऑनलाइन लोकमत
मुंबई, दि. ११ - ख्यातनाम संगीतकार ए आर रेहमान व सिनेनिर्माते माजिद माजिदी यांच्याविरोधात मुंबईतील सुन्नी मुस्लीम गटाने फतवा काढला आहे. या दोघांच्या प्रेषित मोहम्मद पैगंबर यांच्यावर आधारित मोहम्मद - द मॅसेंजर ऑफ गॉड' या चित्रपटावर बंदी टाकावी अशी मागणी या गटाने काढला आहे.
इराणमधील सिनेनिर्माते माजिद माजिदी हे मोहम्मद - द मॅसेंजर ऑफ गॉड हा चित्रपट तयार केला असून या चित्रपटात ए आर रेहमानने संगीत दिले आहे. मात्र यावर मुंबईतील रझा अॅकेडमीने तीव्र नाराजी व्यक्त केली आहे. चित्रपट तयार करणारे दिग्दर्शक व चित्रपटाशी संबंधीत व्यक्तींनी इस्लाम धर्माचा अनादर केल्याचे त्यांनी म्हटले आहे. चित्रपटाशी संबंधीत मुस्लिम व्यक्ती विशेषतः माजिदी व रेहमान यांनी इस्लाम धर्म अपवित्र केला आहे, आता त्यांनी पुन्हा कलमा वाचावा असे फतवा काढण्यात आला आहे. रेहमानने या वृत्तावर कोणतीही प्रतिक्रिया दिलेली नाही.