डॅडाचे लाड...! श्रेयस तळपदेच्या लेकीचा हा क्यूट व्हिडीओ एकदा पाहाच...!!
By ऑनलाइन लोकमत | Published: June 19, 2022 06:21 PM2022-06-19T18:21:09+5:302022-06-19T18:22:09+5:30
Father's Day 2022, Shreyas Talpade : व्हिडीओत, श्रेयसने एक शूज पायात घातला आहे आणि त्याची चिमुकली लेक खाली गुडघ्यावर बसून त्याच्या शूजची लेस बांधत आहे.
![Father's Day 2022 shreyas talpade shared a cute video with daughter | डॅडाचे लाड...! श्रेयस तळपदेच्या लेकीचा हा क्यूट व्हिडीओ एकदा पाहाच...!! Father's Day 2022 shreyas talpade shared a cute video with daughter | डॅडाचे लाड...! श्रेयस तळपदेच्या लेकीचा हा क्यूट व्हिडीओ एकदा पाहाच...!!](https://d3pc1xvrcw35tl.cloudfront.net/images/420x315/untitled.ta442_202206838379.jpg)
डॅडाचे लाड...! श्रेयस तळपदेच्या लेकीचा हा क्यूट व्हिडीओ एकदा पाहाच...!!
Father's Day 2022 : बाबा हा आपला पहिला हिरो असतो. विशेषत: प्रत्येक मुलीचा. आज फादर्स डे निमित्त बाबासाठी हळव्या झालेल्या अनेकांच्या पोस्ट तुम्ही वाचल्या असतील. सेलिब्रिटींनी आपल्या बाबासोबतचे शेअर केलेले फोटोही तुम्ही पाहिले असतील. पण ही पोस्ट सगळ्यात खास आहे. ही पोस्ट शेअर केलीये, अभिनेता श्रेयस तळपदे ( Shreyas Talpade) याने. श्रेयसने त्याच्या लेकीचा क्यूट व्हिडीओ शेअर केला आहे. फादर्स डेच्या दिवशी आपल्या बाबाचे लाड पुरविणाऱ्या श्रेयसच्या लेकीचा हा व्हिडीओ पाहून तुम्हालाही कौतुक वाटल्याशिवाय राहणार नाही.
आज फादर्स डे निमित्त श्रेयस व त्याची लेक शॉपिंगला निघाले. बापलेक एका शूजच्या दुकानात पोहोचले. श्रेयसने स्वत:साठी वेगवेगळे शूज ट्राय केले आणि त्याच्या लेकीने काय तर बाबाला हे शूज ट्राय करण्यासाठी मदत केली.
व्हिडीओत, श्रेयसने एक शूज पायात घातला आहे आणि त्याची चिमुकली लेक खाली गुडघ्यावर बसून त्याच्या शूजची लेस बांधत आहे. तिला लेस बांधायला येत नाही हे माहित असूनही तो तिला ते करू देतोय. ‘चांगले आहेत का हे, की मोठे आहेत?’ असं श्रेयस तिला विचारतो. यावर, ‘बघते आता गाठ बांधून...,’असं ती म्हणते.
‘ ती तुम्हाला राजाप्रमाणे वागवते. तिला माहित असतं तुम्हाला काय हवंय. सध्या मला तिचे चिमुकले हात पकडून फिरायचं आहे आणि ती मात्र त्याच हातांनी मला माझ्या शूजची लेस बांधायला शिकवतेय... तुझा डॅडा झालो, मी खूप भाग्यवान आहे...,’ असं हा क्यूट व्हिडीओ शेअर करताना श्रेयसने लिहिलं आहे.
श्रेयसच्या या व्हिडीओवर चाहत्यांनी भरभरून कमेंट्स केल्या आहेत. अनेक सेलिब्रिटींनीही या व्हिडीओचं कौतुक केलं आहे. किती गोड आहे, आवाज किती गोड आहे या पिल्लूचा अशा कमेंट्स चाहत्यांनी केल्या आहेत.