‘नको त्या’ अवस्थेत वडिलांनी सनीला पकडले...
By Admin | Updated: February 5, 2017 02:26 IST2017-02-05T02:26:38+5:302017-02-05T02:26:38+5:30
पॉर्नस्टार ते बॉलिवूड अभिनेत्री असा प्रवास करणारी सनी लिओनी सध्या भलतीच चर्चेत आहे. नुकत्याच रिलीज झालेल्या ‘रईस’ या सिनेमात सनी ‘लैला मैं लैला’ या आयटम नंबरवर

‘नको त्या’ अवस्थेत वडिलांनी सनीला पकडले...
पॉर्नस्टार ते बॉलिवूड अभिनेत्री असा प्रवास करणारी सनी लिओनी सध्या भलतीच चर्चेत आहे. नुकत्याच रिलीज झालेल्या ‘रईस’ या सिनेमात सनी ‘लैला मैं लैला’ या आयटम नंबरवर थिरकताना दिसली. या आयटम नंबरने प्रेक्षकांवर चांगलीच जादू केली आणि सनी चांगलीच लोकप्रिय झाली. अलीकडे एका मुलाखतीत सनीने तिच्या आयुष्याबद्दलचा धक्कादायक खुलासा केला. होय, सनीच्या वडिलांनी तिला ‘नको त्या’ अवस्थेत पाहिले होते आणि या घटनेने सनी आरपार हादरून गेली होती. सनीने या घटनेबद्दल अगदी मनमोकळेपणे सांगितले. ती म्हणाली, त्या दिवशी मी व माझा बॉयफ्रेन्ड एका मोठ्या हॉलच्या कोपऱ्यात बसलो होतो. मी त्याच्या मिठीत होते. आम्ही इंटिमेट होणार, तोच त्याठिकाणी माझे पप्पा आले. पप्पांनी मला त्या अवस्थेत पाहिले आणि मी जाम घाबरले. ती घटना मी कधीही विसरू शकत नाही. केवळ १३ वर्षांची असताना सनी पहिल्यांदा प्रेमात पडली होती. मिशिगनवरून कॅलिफोर्नियात सनीचे कुटुंब शिफ्ट झाले होते. याठिकाणी सनी वर्षभर राहिली. येथे तिला एक हॉट मुलगा भेटला. ती याबद्दल सांगते, तो अतिशय हॉट होता. मी रोज त्याला लव्ह लेटर लिहायचे. त्या वयात प्रेमाचा अर्थही कळत नव्हता. पण मी त्याच्या प्रेमात अगदी आकंठ बुडाले होते. ‘रोमियो अॅण्ड ज्युलिएट’ हे नाटक त्याच्या सोबत पाहिले आणि यानंतर आम्ही दोघांनी पहिला किस केला. तो अनुभव अद्भूत होता. पण प्रेम बहरत असतानाच कॅलिफोर्निया सोडून मला जावे लागणार होते. तो क्षण माझ्या आयुष्यातील हार्ट फेल करणारा क्षण होता.