फरहानचा ‘ए जी...ओ जी’चा हट्ट!
By Admin | Updated: May 25, 2015 23:19 IST2015-05-25T23:19:17+5:302015-05-25T23:19:17+5:30
अनिल कपूरच्या ‘राम लखन’ सिनेमातील ‘ए जी...ओ जी’ या गाण्याच्या तालावर प्रत्येक जण थिरकण्यास उत्सुक असतो. यातून बॉलीवूडमधील कलाकार तरी कसे मागे राहतील?

फरहानचा ‘ए जी...ओ जी’चा हट्ट!
अनिल कपूरच्या ‘राम लखन’ सिनेमातील ‘ए जी...ओ जी’ या गाण्याच्या तालावर प्रत्येक जण थिरकण्यास उत्सुक असतो. यातून बॉलीवूडमधील कलाकार तरी कसे मागे राहतील? त्या वेळी सिनेमात या गाण्यावर नाचता आले नाही म्हणून हिरमुसलेला ‘जिंदगी ना मिलेगी दोबारा’चा स्टार फरहान अख्तरने वेगळाच हट्ट धरला. त्याच्या आगामी ‘दिल धडकने दो’ चित्रपटात हीच डान्स स्टेप हवी म्हणून तो अडून बसला. सुरुवातीला सगळ्यांनी त्याला वेड्यात काढले. मात्र भावाचा हट्ट बहीण झोया अख्तरने पुरवला. आता अनिल कपूर, रणवीर सिंग आणि फरहान या स्टेपवर नाचताना दिसणार आहेत.