प्लास्टिक सर्जरीच्या फोटोंवर आयेशा टाकियाने दिलं स्पष्टीकरण

By Admin | Updated: February 26, 2017 11:06 IST2017-02-26T11:06:14+5:302017-02-26T11:06:14+5:30

बॉलिवूडची बबली गर्ल आयेशा टाकिया काही दिवसांपासून सोशल मीडियावर चर्चेचा विषय आहे

Explanation of the amount of plastic surgery on Oct. 5 | प्लास्टिक सर्जरीच्या फोटोंवर आयेशा टाकियाने दिलं स्पष्टीकरण

प्लास्टिक सर्जरीच्या फोटोंवर आयेशा टाकियाने दिलं स्पष्टीकरण

ऑनलाइन लोकमत
मुंबई, दि. 26- बॉलिवूडची बबली गर्ल आयेशा टाकिया काही दिवसांपासून सोशल मीडियावर चर्चेचा विषय आहे. कोणत्या चित्रपटामुळे ती चर्चेत नाही तर तिचे प्लॅस्टिक सर्जरी केल्याचे कथित फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाले होते. सर्जरीकरताना चुक झाल्याने आयेशाचा चेहराच बदलला अशून ती विचीत्र दिसत असल्याचे फोटो इंटरनेटवर व्हायरल झाले होते. मात्र, हे फोटो खोटे असल्याचं स्पष्टीकरण स्वतः आयेशाने दिलं आहे. 
 
इन्स्टाग्राम पोस्टमधून आयेशाने स्पष्टीकरण देताना  हेटर्सनी आपले फोटो मॉर्फ केल्याचं म्हटलं आहे. अफवांवर विश्वास न ठेवता पाठिंबा दिल्यामुळे आयेशाने आपल्या फॉलोअर्सचे आभार मानले आहेत. 
 
2004 मध्ये टारझन द वंडर कार सिनेमातून बॉलिवूडमध्ये पदार्पण केल्यानंतर आयेशाने शाहिद कपूरबरोबर दिल मांगे मोर, अभय देओल बरोबर सोचा ना था या चित्रपटात काम केले. 2009 मध्ये सलमान खानच्या वॉन्टेडमध्ये तीने मुख्य अभिनेत्रीची भूमिका केली होती. त्यानंतर आयेशाने समाजवादी पार्टीचे नेते अबू आझमी यांचा मुलगा फरहान आझमी याच्याशी विवाह केला आणि लग्नानंतर आयेशा सिनेसृष्टीपासून दूरच गेली. 2013 मध्ये तिने मुलाला जन्म दिला.

  

Web Title: Explanation of the amount of plastic surgery on Oct. 5

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.