मराठीतही करायचेय उत्कृष्ट काम
By Admin | Updated: July 14, 2016 01:58 IST2016-07-14T01:58:41+5:302016-07-14T01:58:41+5:30
प्रियांका चोप्रा आता चित्रपट निर्मातीही बनली आहे. ती आता प्रादेशिक भाषांमध्येही चित्रपट साकारण्याचा प्रयत्न करत आहे. तिने भोजपुरी भाषेत ‘बम बम बोल रहा हैं काशी’ आणि पंजाबी भाषेत ‘एक ओंकार’

मराठीतही करायचेय उत्कृष्ट काम
प्रियांका चोप्रा आता चित्रपट निर्मातीही बनली आहे. ती आता प्रादेशिक भाषांमध्येही चित्रपट साकारण्याचा प्रयत्न करत आहे. तिने भोजपुरी भाषेत ‘बम बम बोल रहा हैं काशी’ आणि पंजाबी भाषेत ‘एक ओंकार’
चित्रपट निर्माता म्हणून पूर्ण केले आहेत. आता ती मराठी चित्रपट ‘व्हेंटिलेटर’चे तीन दिवसीय शूटिंग पूर्ण करून न्यूयॉर्कला गेली आहे. ती म्हणते,‘मला चित्रपट निर्मितीचा नवा अनुभव येतो आहे. आता मराठीतही मला माझे नशीब आजमवायचे आहे. मुंबईत असल्यापासून मला मराठीचे
फारच वेड आहे. मराठीतील छोटी भूमिका जरी असली तरी मी हसत-हसत करते. आता मला मराठीतही काम सुरू
करावयाचे आहे. त्यात मी अनेकांची मदत नक्कीच घेईन.’