रिलीजआधीच संजूबाबाच्या बायोपिकने कमावले १८० कोटी!
By Admin | Updated: June 10, 2017 00:55 IST2017-06-10T00:55:46+5:302017-06-10T00:55:46+5:30
संजय दत्त सध्या खूपच चर्चेत आहे. नुकतेच त्याने आगामी चित्रपट भूमीचे शूटिंग पूर्ण केले आहे. सगळ्यात जास्त तो त्याच्या बायोपिकला

रिलीजआधीच संजूबाबाच्या बायोपिकने कमावले १८० कोटी!
संजय दत्त सध्या खूपच चर्चेत आहे. नुकतेच त्याने आगामी चित्रपट भूमीचे शूटिंग पूर्ण केले आहे. सगळ्यात जास्त तो त्याच्या बायोपिकला घेऊन चर्चेत आहे. या चित्रपटात संजय दत्तची भूमिका रणबीर कपूर साकारतो आहे. रणबीर कपूरसह सोनम कपूर, अनुष्का शर्मा, परेश रावल, करिश्मा तन्ना, विकी कौशल, दिया मिर्झा यांच्या भूमिका या चित्रपटात आहेत. त्याची भूमिका मोठ्या पडद्यावर साकारण्यासाठी रणबीर प्रचंड मेहनत घेतोय. यासाठी त्यांने वजन वाढवले होते तसेच दाढीसुद्धा वाढवली होती. काही दिवसांपूर्वी रणबीर कपूरचे सोशल मीडियावर फोटो व्हायरल झाले होते ज्यात तो हुबेहुब संजय दत्तसारखा दिसत होता. या चित्रपटात रणबीर कपूर एक नाही, दोन नाही तर एकूण सहा वेगवेगळ्या लूकमध्ये दिसेल. या चित्रपटाचे सेटेलाईट अधिकार विकत घेण्यात आले आहेत. चित्रपटाचे राईट्स विकून राजकुमार हिरानी यांना मिळालेली रक्कम ही त्यांच्या पीके चित्रपटापेक्षा ही जास्त आहे. संजय दत्तचे बायोपिकचे राइट्स फॉक्स स्टार स्टुडिओने १८० कोटीला विकत घेतले आहे.