ईशा गुप्ताच्या टॉपलेस फोटोने घातला इंटरनेटवर धुमाकूळ

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 4, 2020 16:16 IST2020-05-04T15:59:22+5:302020-05-04T16:16:58+5:30

काही दिवसांपूर्वी ईशाने सोशल मीडियावर रिलेशनशिपची कबुली दिली होती.

Esha gupta share topless photo on social media gda | ईशा गुप्ताच्या टॉपलेस फोटोने घातला इंटरनेटवर धुमाकूळ

ईशा गुप्ताच्या टॉपलेस फोटोने घातला इंटरनेटवर धुमाकूळ

बॉलिवूड अभिनेत्री ईशा गुप्ता चित्रपटात दिसली नसली तरी सतत चर्चेत असते. होय, चित्रपट नसले तरी सोशल मीडियाच्या माध्यमातून चर्चेत राहण्याची कला ईशाला चांगलीच अवगत आहे. यासाठी स्वत:चे हॉट फोटो व व्हिडीओ ती शेअर करत असते.  ईशाने तिचा टॉपलेस फोटो शेअर केला आहे. तिचा हा फोटो सध्या इंटरनेटवर धुमाकूळ घालतोय.

काही दिवसांपूर्वी ईशाने सोशल मीडियावर रिलेशनशिपची कबुली दिली होती.. होय, Manuel Campos Gualla सोबतचा फोटो शेअर करत तिने आपले नाते जगजाहिर केले आहे. या फोटोसोबत तिने स्पॅनिशमध्ये काहीतरी लिहिलेय. याचा अर्थ ‘मी तुझ्यावर प्रेम करते’, असा होतो. फोटोत ईशा व मॅन्युअल दोघेही मॅचिंग कपड्यांमध्ये दिसत आहेत.

 ईशाला बॉलिवूडची ‘अँजेलिना जॉली’ म्हटले जाते. 2007 मध्ये मिस इंडिया इंटरनॅशनल हा किताब आपल्या नावावर करणारी ईशा बॉलिवूडची बोल्ड अभिनेत्री म्हणून ओळखली जाते. इमरान हाश्मीसोबत ईशा गुप्ताने ‘जन्नत 2’ चित्रपटातून बॉलिवूडमध्ये पदार्पण केले.

या चित्रपटात ती इमरान हाश्मीच्या अपोझिट दिसली होती. ईशा बॉलिवूडमध्ये बेबी, रुस्तम व बादशाहो, कमांडो, चक्रव्यूह सारख्या चित्रपटात झळकली आहे. शेवटची ईशा ‘टोटल धमाल’ चित्रपटात दिसली होती. बॉक्स आॅफिसवर या सिनेमा चांगला गल्ला जमावला होता.

 

Web Title: Esha gupta share topless photo on social media gda