दुश्मन भी दोस्त बन सकते हैं
By Admin | Updated: April 1, 2016 02:30 IST2016-04-01T02:30:30+5:302016-04-01T02:30:30+5:30
‘का रे दुरावा’ मालिकेत रजनी अदितीवर सारखी चिडचिड, भांडण व टोमणे मारत असते. यावरून असेच वाटते, की या दोघींचे बिलकूल पटत नसणार; पण या दोघी म्हणजेच सुरुची

दुश्मन भी दोस्त बन सकते हैं
‘का रे दुरावा’ मालिकेत रजनी अदितीवर सारखी चिडचिड, भांडण व टोमणे मारत असते. यावरून असेच वाटते, की या दोघींचे बिलकूल पटत नसणार; पण या दोघी म्हणजेच सुरुची आडारकर आणि नेहा जोशी रील लाइफमध्ये जरी दुश्मन असल्या, तरी रीअल लाइफमध्ये खूप चांगल्या मैत्रिणी आहेत. या दोघींनी नुकतेच सोशल मीडियावर एका कार्यक्रमादरम्यानचा एक सेल्फी अपलोड केला आहे. या दोघीही मालिकेत कितीही सलवार कमीज गर्ल दिसत असल्या, तरी या सेल्फीमध्ये मात्र वेस्टर्न लूकमध्ये एकदम
झक्कास झळकल्या. यामध्ये सुरुची जीन्स,
टी-शर्ट, जॅकेट यामध्ये अधिक सुंदर वाटत होती, तर नेहाही वन पीसमध्ये अधिक खुलून दिसत होती. या दोघींचे हे प्रेम पाहता, दुश्मन भी दोस्त
बन सकते हैं नक्की.