एमा वॉटसनने दिल्या होळीच्या शुभेच्छा,पाठवला खास व्हिडीओ
By Admin | Updated: March 12, 2017 21:00 IST2017-03-12T21:00:26+5:302017-03-12T21:00:26+5:30
हॉलीवुडची दिग्गज अभिनेत्री एमा वॉटसनवर भारतात होत असलेल्या होळी सणाचा रंग चढलाय. एमा वॉटसनने एका व्हिडीओद्वारे भारतीयांना होळीच्या शुभेच्छा दिल्या

एमा वॉटसनने दिल्या होळीच्या शुभेच्छा,पाठवला खास व्हिडीओ
ऑनलाइन लोकमत
मुंबई, दि. 12 - हॉलीवुडची दिग्गज अभिनेत्री एमा वॉटसनवर भारतात होत असलेल्या होळी सणाचा रंग चढलाय. एमा वॉटसनने एका व्हिडीओद्वारे भारतीयांना होळीच्या शुभेच्छा दिल्या आहेत.
एमा वॉटसनचा आगामी सिनेमा ‘ब्यूटी एंड द बीस्ट’ 17 मार्चला प्रदर्शित होणार आहे. त्यामुळे भारतीय चाहत्यांसोबत जोडण्याच्या दृष्टीकोनातून तिने हा व्हिडीओ शेअर केला आहे.
“नमस्ते इंडिया, तुम्हा सर्वांना होळीच्या शुभेच्छा. मार्चमध्ये तुमच्या जवळच्या सिनेमाघरांमध्ये जाऊन 'ब्यूटी एंड द बीस्ट’ सिनेमा पाहायला विसरू नका" असा संदेश तिने व्हिडीओतून दिला आहे.
हॅरी पॉटर अभिनेत्री एमा वॉटसनचे भारतात अनेक चाहते आहेत. ‘ब्यूटी एंड द बीस्ट’ हा एक 3D म्यूजिकल रोमॅंटिक-डार्क फॅन्टसी सिनेमा आहे. यामध्ये एमासोबत डॅन स्टीवन्स आणि ल्यूक इवान्स हे देखील आहेत.