मृण्मयीच्या तीन भूमिका दाखवणारा ‘अठरावा उंट’
By Admin | Updated: January 22, 2016 02:06 IST2016-01-22T02:06:40+5:302016-01-22T02:06:40+5:30
मृण्मयी देशपांडे एकाच चित्रपटात तीन वेगवेगळ्या भूमिका साकारणार की काय, असं तुम्हाला वाटणं साहजिक आहे. पण तसं काही नाहीय.

मृण्मयीच्या तीन भूमिका दाखवणारा ‘अठरावा उंट’
मृण्मयी देशपांडे एकाच चित्रपटात तीन वेगवेगळ्या भूमिका साकारणार की काय, असं तुम्हाला वाटणं साहजिक आहे. पण तसं काही नाहीय.ऐका तर मगं... कट्यार काळजात घुसली नाटकावर आधारित चित्रपटामध्ये एक से बढकर एक दिग्गज कलाकारांनी अभिनय साकारला होता. त्यामध्ये दिग्दर्शक सुबोध भावे यांनी शंकर महादेवन, अरिजित सिंग, शंकर-एहसान लॉय या त्रिकुटाचे संगीत, आजवरच्या कारकिर्दीत प्रथमच खलनायकाची भूमिका साकारणारे सचिन पिळगावकर अशी सरप्राईजवर सरप्राईज दिली होती. आता याच चित्रपटातील तीन कलाकार पुन्हा एकदा ‘अठरावा उंट’ या चित्रपटाच्या निमित्ताने एकत्र येत आहेत. ते तीन कलाकार म्हणजे कट्यार काळजात घुसली चित्रपटात प्रमुख भूमिका साकारलेले सचिन पिळगावकर, सुबोध भावे आणि मृण्मयी देशपांडे. हा आगामी चित्रपट मृण्मयी देशपांडे स्वत: दिग्दर्शित करीत असून ती स्वत:च निर्मितीही करणार आहे. इतकेच नाही तर चित्रपटात अभिनय करतानाही मृण्मयीला पाहायला मिळणार आहे.