मैत्रीवर भारी पडतोय ईगो

By Admin | Updated: October 17, 2015 02:13 IST2015-10-17T02:13:54+5:302015-10-17T02:13:54+5:30

बॉलिवूडमध्ये मैत्री आणि ती तुटण्याचे किस्से काही नवीन नाहीत. अनेकांच्या लक्षात असेल की कतरिना कैफच्या बर्थ डे पार्टीने शाहरुख खान आणि सलमान खानच्या मैत्रीला कसे ग्र्रहण लागले होते.

Eggo is very heavy on friendship | मैत्रीवर भारी पडतोय ईगो

मैत्रीवर भारी पडतोय ईगो

बॉलिवूडमध्ये मैत्री आणि ती तुटण्याचे किस्से काही नवीन नाहीत. अनेकांच्या लक्षात असेल की कतरिना कैफच्या बर्थ डे पार्टीने शाहरुख खान आणि सलमान खानच्या मैत्रीला कसे ग्र्रहण लागले होते. अनेक वर्षांपर्यंत मीडिया आणि जगाने खान स्टारच्या दुश्मनी बाबत आपसातील वाद आणि आरोप-प्रत्यारोपांना पाहिले. मात्र चांगली गोष्ट म्हणजे ते पुन्हा चांगले मित्र झाले आहेत. आता ते चांगले मित्र राहतील अशी अपेक्षा केली जाऊ शकते.
सुनील शेट्टी आणि अक्षय कुमार यांचा बॉलिवुडमधील संघर्ष जवळजवळ एकाचवेळी सुरू झाला. दोघांना यशही सोबतच मिळाले आणि त्यांच्या मैत्रीला जोडी बनविण्यात त्यांच्या चित्रपटांच्या यशाचे मोठे योगदान राहिले. दोघांनी मोहरापासून हेराफेरीपर्यंत अनेक चित्रपटांचे यश शेयर केले, मात्र आज या दोघांच्या संबंधांचे सत्य हे आहे की, दोघांमध्ये साधे बोलणेही होत नाही. येथेही मामला ईगोचाच मानला जातो. एक वेळी अक्षय कुमार आणि सुनील शेट्टी यांच्या जोडीला अमिताभ बच्चन-विनोद खन्नांच्या जोडीसारखे पॉवरफुल म्हटले जात होते.
अशाच प्रकारची आणखी एक जोडी अनिल कपूर आणि जॅकी श्रॉफ यांची होती. एक डझनहून जास्त चित्रपटात काम केलेल्या अनिल आणि जॅकीने कर्मा आणि रामलखनपासून परिंदापर्यंत अनेक चित्रपटांमध्ये काम केले आणि पाहता पाहता त्यांची मैत्रीही घट्ट होत गेली. या जोडीलाही मोठ्या अपेक्षेने पाहिले गेले. पण, आज दोघांमध्ये बोलणे होत नाही. एखाद्या समारंभात सोबत दिसले तरी संवादाचा अभाव जाणवतोच. चित्रपटांचा इतिहास पाहिला तर दिलीप कुमार, देव आनंद आणि राज कपूर या
त्रिकुटांचे मार्ग वेगवेगळे होते मात्र
मैत्रीवर त्याची झळ त्यांनी कधी जाणवू दिली नाही.
नसिरुद्दीन शाह आणि ओम पुरी म्हणजे समांतर आणि व्यावसायिक चित्रपटातील अगदी हिट जोडी. रील लाईफ आणि रिअल लाईफ दोन्हीकडे यांची प्रदीर्घ मैत्री खूप गाजली. परंतु मागच्या काही दिवसांपासून सोशल मीडियावर त्यांच्या मैत्रीत अंतर आल्याचे वृत्त गाजत आहे. पुणे येथे चित्रपट इंस्टिट्यूटपासून सोबत राहिलेल्या भारतीय चित्रपटाच्या या दोन दिग्गजांची मैत्री का तुटली, याबाबत वेगवेगळी कारणे समोर येत आहेत. मात्र ज्या कारणावर विश्वास केला जाऊ शकतो तो एकच म्हणजे ईगो. दोघांचे कॉमन मित्रही हेच मानतात की, ईगोमुळेच एवढ्या वर्षांची मैत्री तुटली आहे.

Web Title: Eggo is very heavy on friendship

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.