कबालीसाठी रजनीकांतला किती पैसे मिळाले माहीत आहे का?
By Admin | Updated: July 27, 2016 10:37 IST2016-07-27T10:34:07+5:302016-07-27T10:37:03+5:30
दाक्षिणात्य सुपरस्टार यांच्या 'कबाली' चित्रपटाने कमाईचे सर्व रेकॉर्ड मोडत २५० कोटींहून अधिक कमाई केली आहे.

कबालीसाठी रजनीकांतला किती पैसे मिळाले माहीत आहे का?
style="text-align: justify;">ऑनलाइन लोकमत
चेन्नई, दि. २७ - दाक्षिणात्य सुपरस्टार यांच्या 'कबाली' चित्रपटाने कमाईचे सर्व रेकॉर्ड मोडत २५० कोटींहून अधिक कमाई केली आहे. भारतासोबत चीन, मलेशिया आणि इतर देशांमध्ये प्रदर्शित करण्यात आलेल्या कबाली चित्रपटाने फक्त तामिळनाडूमध्येच 100 कोटींची कमाई केली होती. रजनीकांत यांचा हा चित्रपट सुपर डुपर हिट ठरला असून त्यांचे चाहते मोठ्या संख्येने हा चित्रपट पाहण्यास जात आहेत. पहिल्या आठवड्यातच २०० कोटींचा टप्पा पार केलेल्या या चित्रपटासाठी खुद्द रजनीकांत यांना किती मानधन मिळाले माहीत आहे का ? या चित्रपटासाठी त्यांना 35 कोटी रुपये मानधन देण्यात आल्याचे वृत्त आहे.
रिलीज होण्याआधीच कबाली चित्रपटाची चाहत्यांमध्ये प्रचंड उत्सुकता निर्माण झाली होती. सोशल मिडियावरदेखील चित्रपटाची जोरदार चर्चा सुरु होती. पहिल्यांदाच सकाळी 5 वाजल्यापासून चित्रपटाचे शो सुरु करण्यात आले होते. रजनीकांत यांच्या चित्रपटांचं वेड इतकं आहे की चेन्नई, बंगळुरुमधील कार्यालयांना सुट्टी जाहीर करण्यात आली होती. इतकंच नाही सोशल मिडियावरही जोक्सनी धुमाकूळ घातला होता. 'सलमान, शाहरुख सुट्ट्यांना चित्रपट रिलीज करतात मात्र रजनीकांत यांनी चित्रपट रिलीज केला की सुट्टी जाहीर होते' हा विनोद तर हमखास रोज कोणत्या ना कोणत्या व्हाट्सअॅप ग्रुपवर पडतो आहे. एका चाहत्याने तर आपल्या एक दोन नाही तर 200 मित्रांसाठी चित्रपटाचा शो बुक केला, आणि यासाठी मोजले तब्बल 1 लाख 2 हजार 500 रुपये.
कबाली हा चित्रपट जगभरातील तब्बल 8 ते 10 हजार स्क्रिन्सवर रिलीज करण्यात आला होता. यामध्ये अमेरिकेतील 480, मलेशियातील 490 आणि आखाती देशांमधील 500 देशांचा समावेश आहे. युके, ऑस्ट्रेलिया, न्यूझीलंड, श्रीलंका, स्वित्झर्लंड, डेन्मार्क, हॉलंड, स्वेडन, दक्षिण अफ्रिका आणि नायजेरिया या देशांमध्ये हा चित्रपट प्रदर्शित करण्यात आला आहे. जगभरात चित्रपटाने 100 कोटींचा व्यवसाय केला.