तुम्हाला माहित्येय? ही बाँड गर्ल आधी होता पुरूष!
By Admin | Updated: April 26, 2016 13:33 IST2016-04-26T13:26:44+5:302016-04-26T13:33:35+5:30
फॉर युवर आईज ओन्ली या रॉजर मूरच्या बाँडपटामधली एक हिरॉइन कॅरोलिन कोसी ही चक्क आधी पुरूष होती. मूळचा बॅरी कोसी असं या तरुणाचं नाव होतं

तुम्हाला माहित्येय? ही बाँड गर्ल आधी होता पुरूष!
>फॉर युवर आईज ओन्ली या रॉजर मूरच्या बाँडपटामधली एक हिरॉइन कॅरोलिन कोसी ही चक्क आधी पुरूष होती. मूळचा बॅरी कोसी असं या तरुणाचं नाव होतं. नंतर त्याच्या लक्षात आलं की आपण पुरूष म्हणून नाही तर महिला म्हणूनच जगू शकतो. 1972मध्ये त्यानं आपलं नाव बदलून कॅरोलिन कोसी असं ठेवलं आणि औषधं आणि शेवटी शस्त्रक्रिया करत 1974मध्ये पुरुष ते स्त्री असा शारिरीक बदल त्यानं केला. 1979 ते 1986 या काळात फॅशन मॉडेल म्हणून काम करताना कॅरोलिनला जेम्स बाँडच्या चित्रपटात ब्रेक मिळाला.
सिनेमा 1981 मध्ये प्रदर्शित झाल्यानंतर एका वृत्तपत्राने कॅरोलन आधी पुरूष होता, ही बातमी फोडली आणि एकच खळबळ उडाली, ज्याचा तिच्या करीअरवरही परिणाम झाला.
कायद्यानुसार कॅरोलिन पुरूष असल्याने लग्नात व्यत्यय आला, कारण कोर्टाने वधू आणि वर हे महिला व पुरूष नाहीत असं मत नोंदवलं आणि लग्न बाद ठरलं. त्यानंतर मात्र, डेव्हिड फिंच या कॅनडियन व्यक्तिशी कॅरोलिननं विवाह केला.