ओव्हरस्मार्ट नको बनूस, सलमान खानचा या अभिनेत्याला सल्ला
By Admin | Updated: March 6, 2017 14:49 IST2017-03-06T14:49:28+5:302017-03-06T14:49:50+5:30
ओव्हरस्मार्ट बनू नकोस आणि दिग्दर्शकाचं ऐकत जा असा सल्ला सलमानने दिला

ओव्हरस्मार्ट नको बनूस, सलमान खानचा या अभिनेत्याला सल्ला
>ऑनलाइन लोकमत
मुंबई, दि. 6 - सुपरस्टार सलमान खानचा प्रसिद्ध सिनेमा 'जुडवा' या सिनेमाच्या सिक्वेलमधून अभिनेता वरुण धवन रुपेरी पडद्यावर झळकणार आहे. या सिनेमासाठी, ओव्हरस्मार्ट बनू नकोस आणि दिग्दर्शकाचं ऐकत जा असा सल्ला सलमानने वरूण धवनला दिला आहे.
जुडवा-2 साठी सलमानने मला केवळ वडिलांचं ऐकत जा आणि ओव्हरस्मार्ट न बनण्याचा सल्ला दिला असं वरूण धवन म्हणाला. 1997 मध्ये जुडवा प्रदर्शित झाला त्यावेळी मी लहान होतो. त्या सिनेमाच्या स्पेशल स्क्रिनींगदरम्यान मी सलमानला भेटलो होतो इतकंच मला आठवतं असं वरूण म्हणाला.
वरुणसोबत या सिनेमात अभिनेत्री जॅकलिन फर्नांडिस आणि तापसी पन्नूसुद्धा झळकणार आहेत. 1997 मध्ये प्रदर्शित झालेल्या ‘जुडवा’ या सिनेमाचं दिग्दर्शनसुद्धा डेविड धवन यांनीच केले होते.