माझ्या भूमिकेची तुलना माधुरीशी नको : दीपिका
By Admin | Updated: October 23, 2014 00:57 IST2014-10-23T00:57:59+5:302014-10-23T00:57:59+5:30
दीपिका पदुकोणने हॅप्पी न्यू ईअर या चित्रपटात मोहिनी जोशी नावाच्या एका डान्सरची भूमिका निभावली आहे.

माझ्या भूमिकेची तुलना माधुरीशी नको : दीपिका
दीपिका पदुकोणने हॅप्पी न्यू ईअर या चित्रपटात मोहिनी जोशी नावाच्या एका डान्सरची भूमिका निभावली आहे. तिच्या या भूमिकेची तुलना तेजाबमधील माधुरी दीक्षितच्या मोहिनी नावाच्या भूमिकेशी करणे योग्य नसल्याचे तिचे म्हणणे आहे. माधुरी दीक्षितची भूमिका प्रतिष्ठित आहे. या भूमिकांमध्ये नाव सोडता इतर काहीही सारखे नाही. दोन्ही भूमिका एकमेकांपेक्षा खूप वेगळ्या आहेत. दीपिकाने या चित्रपटात मराठी आणि हिंदीत डायलॉग म्हटले आहेत.‘गेल्या सात वर्षांपासून मुंबईत राहत असल्याने मला मराठी लोकांशी बोलण्याची संधी मिळाली. त्याशिवाय माझी मातृभाषा कोंकणी आहे, ती काहीअंशी मराठीसारखीच आहे. त्यामुळे ही भाषा बोलणे माझ्यासाठी फारसे अवघड नव्हते,‘असे दीपिका सांगते. हॅप्पी न्यू ईअर येत्या २४ आॅक्टोबरला रिलीज होत असून हा चित्रपट यशस्वी ठरेल अशी दीपिकाला आशा आहे.