अशी आहे ज्ञानदा रामतीर्थकरची लव्हस्टोरी! होणारा नवरा हर्षद गायकवाडची पोस्ट व्हायरल
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 24, 2025 17:39 IST2025-12-24T17:38:50+5:302025-12-24T17:39:57+5:30
किती वर्षांपासून डेट करत आहेत ज्ञानदा आणि हर्षद?

अशी आहे ज्ञानदा रामतीर्थकरची लव्हस्टोरी! होणारा नवरा हर्षद गायकवाडची पोस्ट व्हायरल
'लग्नानंतर होईलच प्रेम' या लोकप्रिय मालिकेत दिसत असलेली काव्या म्हणजेच प्रेक्षकांची लाडकी अभिनेत्री ज्ञानदा रामतीर्थकरने काल साखरपुडा करत सर्वांना सरप्राईज दिलं. ज्ञानदाने आधी मेहंदीचा व्हिडीओ शेअर केला. नंतर होणार्या नवऱ्याचा हातात हात घेऊन तिने पोस्ट केली. यामध्ये तिने नवऱ्याचा चेहरा दाखवला नव्हता. काही वेळाने ज्ञानदाने साखरपुड्याचे फोटो सर्वांना दाखवले. ज्ञानदाचा होणारा नवरा सिनेमॅटोग्राफर आहे. त्याने आता आपल्या इन्स्टाग्राम स्टोरीमधून त्यांची प्रेमकहाणी मोजक्या शब्दात सांगितली आहे.
ज्ञानदाने काल सिनेमॅटोग्राफर हर्षद गायकवाडसोबत साखरपुडा केला. ज्ञानदा डार्क पिवळ्या रंगाच्या साडीत सुंदर दिसत होती. तर सर्वांच्या नजरा हर्षदवर खिळल्या. ज्ञानदा आणि हर्षद यांची ओळख कशी झाली? कधीपासून ते सोबत होते? असे प्रश्न अनेकांना पडले. आता हर्षदने इन्स्टाग्रामवर स्टोरी पोस्ट करत हे थोडक्यात सांगितलं. त्याने लिहिले, "७ वर्ष... प्रेमाची, सहनशीलतेची, नकाराची, धड्याची आणि तरी प्रत्येक दिवस एकमेकांनाच निवडण्याची. एंगेज झालो."

हर्षदच्या या स्टोरीमधून हे जाणवतं की त्यांच्या प्रेमकहाणीत अनेक अडथळे आले ज्यावर मात करत दोघंही आज इथपर्यंत पोहोचले आहेत. २०१९ पासून दोघांच्या रिलेशिनशिपला सुरुवात झाली. आज साखरपुडा केल्यावर आता लवकरच दोघं लग्नबंधनात अडकणार आहेत.
हर्षद मनोरंजनक्षेत्रातीलच असल्याचं त्याच्या सोशल मीडियावरुन दिसून येतं. 'बंधू' हा त्याचा पहिला सिनेमा ज्याची त्याने सिनेमॅटोग्राफीची जबाबदारी सांभाळली होती. यासोबत त्याने काही अॅड फिल्म्सही केल्या आहेत.