‘राक्षस’ची चर्चा आंतरराष्ट्रीय पातळीवर
By Admin | Updated: December 5, 2015 09:09 IST2015-12-05T09:09:42+5:302015-12-05T09:09:42+5:30
एंटरटेनमेंट, सस्पेन्स, थ्रिलर आणि इमोशन ड्रामा असलेला फॅमिली एंटरटेनिंग ‘राक्षस’ हा चित्रपट लवकरच आपल्या भेटीला येणार असून, २३ नोव्हेंबरपासून चित्रपटाच्या शूटिंगला सुरुवात झाली

‘राक्षस’ची चर्चा आंतरराष्ट्रीय पातळीवर
एंटरटेनमेंट, सस्पेन्स, थ्रिलर आणि इमोशन ड्रामा असलेला फॅमिली एंटरटेनिंग ‘राक्षस’ हा चित्रपट लवकरच आपल्या भेटीला येणार असून, २३ नोव्हेंबरपासून चित्रपटाच्या शूटिंगला सुरुवात झाली आहे. मात्र, हा चित्रपट शूट होण्याआधीच त्याच्या कथेची जगातील प्रसिद्ध आणि नामांकित ‘दृश्यम संडन्स रायटर्स लॅब’मध्ये निवड झाल्यामुळे आंतरराष्ट्रीय पातळीवर ‘राक्षस’ची चर्चा आधीपासूनच आहे. या चित्रपटात अभिनेत्री सई ताम्हणकर आणि लय भारी फेम शरद केळकर असून, या जोडीला प्रथमच मोठ्या पडद्यावर एकत्र पाहायची संधी आपल्याला मिळणार आहे. ‘लय भारी’मध्ये शरद केळकर आपल्याला निगेटिव्ह भूमिकेत पाहायला मिळाला; पण राक्षस चित्रपटात तो सकारात्मक भूमिका साकारत आहे. चित्रपटाची कथा कौटुंबिक भावनिक दर्शन घडवणारी असून, बालकलाकार ऋजुता देशपांडे मुन्नी ही महत्त्वाची व्यक्तिरेखा यामध्ये साकारत आहे. चित्रपटाची कथा ज्ञानेश झोटिंग यांची असून, ते स्वत: दिग्दर्शनही करणार आहेत. तर नीलेश नवलाखा आणि विवेक कजारिया चित्रपटाची निर्मिती करत आहेत.